AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती धाडस, मुलीने थेट आईला दाखवला बॉयफ्रेंडसोबतचा तो फोटो, बघताच आई घाबरली अन्..

मुली काय करतील याचा काही आता नेम राहिला नाही. थेट एका मुलीने आईला तिचा बॉयफ्रेंडचा फोटो दाखवला आणि म्हणाली तो आपल्या घरी येणार आहे. त्यावर आईची प्रतिक्रिया पाहून अनेकजण थक्क झाले.

किती धाडस, मुलीने थेट आईला दाखवला बॉयफ्रेंडसोबतचा तो फोटो, बघताच आई घाबरली अन्..
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 18, 2026 | 5:47 PM
Share

Viral Video : सध्या सोशल मीडियावर हटके, हसवणारे आणि तणाव विसरायला लावणारे कंटेंट प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः घरातील आई-मुलींचे गमतीशीर क्षण असलेले व्हिडीओ नेटकऱ्यांच्या मनाला लगेच भिडतात. असाच एक मजेशीर आणि हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो पाहून लाखो लोक खळखळून हसत आहेत.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील पावनी अवस्थी या तरुणीने आपल्या आईसोबत केलेला हा निरागस प्रॅक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या प्रॅकमध्ये तिने AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा अनोखा वापर केला आहे.

AI-जनरेटेड फोटो आणि ‘बॉयफ्रेंड’चा दावा

हा व्हायरल व्हिडीओ एका साध्या पण भन्नाट कल्पनेवर आधारित आहे. पावनीने ChatGPT च्या मदतीने एक AI-जनरेटेड फोटो तयार केला. या फोटोमध्ये ती एका अनोळखी तरुणाच्या अगदी जवळ उभी असल्याचे दिसते. हाच फोटो तिने आपल्या आईला मोबाईलवर दाखवत अगदी सहजपणे, मम्मा, हा माझा बॉयफ्रेंड आहे असे सांगितले.

इतक्यातच घरात वातावरण बदलते आणि खरी मजा सुरू झाली. भारतीय आई हा फोटो पाहताच अॅक्शन मोडमध्ये आली. व्हिडीओमध्ये पावनी शांतपणे फोटो दाखवताना दिसते. मात्र फोटो पाहताच तिच्या आईचा पारा चढतो. अगदी सर्वसाधारण भारतीय आईप्रमाणेच तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. ती म्हणते की, अरे, कुणी पाहिलं तर आपली इज्जत जाईल. हा मुलगा कोण आहे? इतकी जवळ उभी का आहेस? पप्पांनी पाहिलं तर काय होईल? असे एकामागोमाग प्रश्न पडतात.

पावनी मात्र अगदी गंभीर चेहऱ्याने उत्तर देत राहते. इतकेच नाही तर ती गंमतीने म्हणते, तो लवकरच घरी येणार आहे. हे ऐकताच आई अधिकच गंभीर होते. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य, काळजी आणि भीती पाहून प्रेक्षकांना हसू आवरता येत नाही. काही वेळानंतर पावनी आईला सांगते की हा सगळा प्रकार फक्त एक प्रॅक आहे आणि दाखवलेला फोटो AI ने तयार केलेला आहे. हे समजताच आई सुटकेचा निःश्वास सोडते आणि तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटते.

View this post on Instagram

A post shared by Pawani (@pawani_awasthi_)

लाखो व्ह्यूज आणि मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडीओ आतापर्यंत 35 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. कमेंट्समध्येही विनोदांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...