AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्युसर खाली ग्लास ठेवायला विसरला ‘खली’, 2 संत्रीचा ज्यूस काढल्यानंतरही ग्लास खालीच, पाहा भन्नाट Video!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खली हायवेच्या बाजूला हातगाडीजवळ उभा आहे आणि ज्यूस मशीनमध्ये दोन संत्र्या टाकून ज्यूस काढू लागतो. पण, यादरम्यान तो ज्यूसचा ग्लास बरोबर मशीनच्या खाली ठेवायला विसरतो.

ज्युसर खाली ग्लास ठेवायला विसरला 'खली', 2 संत्रीचा ज्यूस काढल्यानंतरही ग्लास खालीच, पाहा भन्नाट Video!
संत्र्यांचा ज्यूस काढताना द ग्रेट खली
| Edited By: VN | Updated on: Nov 23, 2021 | 1:56 PM
Share

द ग्रेट खली जर कुस्तीनंतर कुठं सर्वात प्रसिद्ध असेल तर ते आहे इंस्टाग्राम, त्याने केलेले पराक्रम कोणीही करू शकत नाही. खली इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय असतो आणि सतत काही ना काही करत व्हिडिओ अपलोड करत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू फुटेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये  खली हायवेच्या बाजूला हातगाडीजवळ उभा आहे आणि ज्यूस मशीनमध्ये दोन संत्र्या टाकून ज्यूस काढू लागतो. पण, यादरम्यान तो ज्यूसचा ग्लास बरोबर मशीनच्या खाली ठेवायला विसरतो. त्यामुळे सर्व रस खाली पडू लागतो. ज्यूस काढत म्हणतो, मित्रांनो, तुम्ही म्हणता आमच्या भारताची प्रगती झाली नाही..! बघा, आम्ही भारतात पूर्वीही ज्यूस बनवायचो, अजूनही ज्यूस बनवतो आहोत. हे मेक इन इंडिया आहे…मग तो म्हणतो की, आपल्या देशाची प्रगती झाली की नाही, हे बघा, तरुण-तरुणी ज्यूस काढण्यात गुंतले आहेत, मित्रांनो देवा तुमचा भलं करो, काळजी घ्या..!

हा व्हिडीओ पाहा

हा व्हिडिओ शनिवारी द ग्रेट खलीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल @thegreatkhali द्वारे शेअर केला गेला, जो हजारो युजरला आवडला आहे. खलीचा हा व्हिडिओ लोकांना मजेदार वाटत आहे. हे बघून लोक खूप एन्जॉय करू लागले आहेत. कुणी म्हणतं की तू कसा रस काढतोयस की सगळं बाहेर पडतंय. तर, आता खली ज्यूस सेंटर सुरू होणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

याआधी द ग्रेट खलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने बुक्की मारून दगड फोडला होता. याशिवाय, खलीच्या व्हिडिओंमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे, लोक त्याच्या व्हिडिओंवर मजेशीर कमेंट करत असतात. जसे लोकांनी या व्हिडिओवरील लोकांवर केले. एका यूजरने व्हिडिओवर लिहिले आहे की, सर, या ऑटोला उचला आणि चंद्रावर फेकून द्या..! कुठेतरी कुणी लिहिलंय की साहेब, हा ऑटो तुमच्यासाठी खेळणंच आहे.

हेही वाचा:

Video: दमदार दाढीची कमाल, 63 किलो महिलेला दाढीने उचलून झाला मालामाल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव!

Video: माणिके मागे हिते वर बौद्ध भिक्षुंचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, संगीताला धर्म आणि भाषा नसते!

 

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...