VIDEO | पिंजऱ्यातले पक्षी विकत घेतले, विक्रेत्याच्या समोर आकाशात सोडले, नेटकरी म्हणाले….,

Viral Video | पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हा माणूस पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी पक्षी विकत घेत आहे." हा व्हिडीओ सोशल मीडियावर मिलियनमध्ये लोकांनी पाहिला आहे.

VIDEO | पिंजऱ्यातले पक्षी विकत घेतले, विक्रेत्याच्या समोर आकाशात सोडले, नेटकरी म्हणाले....,
Viral Video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 27, 2023 | 9:43 AM

मुंबई : आपल्या देशात एखाद्या पक्षाला (bird) पिंजऱ्यात पाहिल्यानंतर अनेकांना त्रास होता. अनेकांना ते पाहावलं जात नाही, काहीजण त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न देखील करतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (viral video)झाला आहे. त्यातून एका व्यक्तीचं पक्ष्यांवरती किती प्रेम आहे हे पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने कित्येक पक्ष्यांना मुक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया सुध्दा दिल्या आहेत.

व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटरवरती B&S या नावाच्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ एकदम छोटा आहे. एक व्यक्ती पक्षी विक्रेत्याकडून पक्षी विकत घेत आहे. त्याचबरोबर त्यांच्यासमोर ते पक्षी आकाशात सोडतं आहे. ती व्यक्ती एका कारमध्ये बसली आहे. विक्रेत्याकडे असलेल्या पिंजऱ्यात अनेक पक्षी आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर पक्ष्यांना मुक्त केल्याबद्दल अनेकांनी त्या व्यक्तीचे आभार मानले आहेत.

ज्यावेळी ती व्यक्ती पिंजऱ्यात असलेल्या एका-एका पक्ष्याला आझाद करीत आहे. हा सगळा प्रकार समोर असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलं आहे. ट्विटरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ही व्यक्ती फक्त त्या पक्षांना मुक्त करण्यासाठी खरेदी करीत आहे.


हा व्हिडीओ आतापर्यंत सात लाख लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर नेटकरी त्या व्यक्तीचं कौतुक करुन प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘देव त्याचं भलं करेल,’ आणखी एक नेटकरी म्हणतो की, ‘सुपरहिरो’अशा पद्धतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना आवडतात. त्याचबरोबर अनेकजण असे व्हिडीओ स्वत:हून शेअर करतात.