इटलीतील रेस्टॉरंटच्या या अनोख्या नियमाने पतीचा खिसा झाला रिकामा,चक्क 77000 रुपयांचे बिल आले…
Italy restaurant menu without prices: काही रेस्टॉरंट त्यांच्या थीमसाठी प्रसिद्ध असतात. परंतू इटलीतील एका रेस्टॉरंटचा भन्नाट अनुभव इंस्टाग्राम युजरने सांगितला आहे.

रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण मेन्यू कार्डमध्ये पदार्थांचे रेट पाहून पदार्थांची ऑर्डर करत असतो.परंतू इटलीतील एका रेस्टॉरंटमध्ये एक कपल गेले तर त्यांना विचित्र अनुभव आला. त्या रेस्टॉरंटमध्ये अनोखी थीम होती. पुरुषांना दिलेल्या मेन्यू कार्डमध्येच पदार्थांचे दर लिहिलेले होते. आणि महिलांच्या मेन्यू कार्ड कोणत्याही पदार्थांचे दर दिले नव्हते. त्यामुळे महिलांना आरामात पदार्थांचा आस्वाद घेता यावा आणि पुरुषांकडे बिल भरण्याची जबाबदारी असल्याने त्यांच्या मेन्यू कार्डवर पदार्थांचे दर लिहिलेले होते.
इंस्टाग्राम युजर लियाना आपल्या पती सोबत इटलीच्या प्रसिद्ध ग्रँड हॉटेल ट्रेमेझो ( Lake Como ) रेस्टॉरंटमध्ये डीनरसाठी गेली होती. जेव्हा जेवण ऑर्डर करण्यासाठी ही महिला मेन्यू कार्ड पाहू लागल्या तर त्यात कोणत्याही पदार्थांचे रेट दिले नव्हते. लियाना यांनी आश्चर्यचकीत होत त्यांच्या पतीला ही गोष्ट सांगितले. तेव्हा त्यांच्या पतीने त्यांचे मेन्यू कार्ड दाखवले आणि त्यात मात्र रेट लिहिले होते.
वास्तविक इटलीतील शाही आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये एक जुनी परंपरा आहे. तेथे महिलांना रेट नसलेले सायलेंट मेन्यू कार्ड दिले जाते. म्हणजे त्यांनी पैशाची चिंता न करता आरामात पदार्थांवर ताव मारावा. तर रेटवाले मेन्यूकार्ड केवळ त्या महिलेच्या पुरुष सहकारी पार्टनरला दिले जाते. सुरुवातीला लियाना यांना हा अंदाज आवडला. तिने कोणत्याही टेन्शनशिवाय पदार्थांवर येथेच्छ ताव मारला. मात्र, जेव्हा फायनल बिल आले तेव्हा लियाना या धक्काच बसला.
संपूर्ण जेवणाचे बिल $926.86 ( म्हणजे सुमारे 77,000 रुपयांहूनही जास्त ) झाले होते. त्यात रेट माहिती न करता मागवलेल्या दोन ड्रींक्सचे बिल $120 ( सुमारे ₹10,000 ) आणि एका छोट्या बर्थडे केक-डेझर्टचे $140 ( सुमारे ₹11,500 ) बिल इतके झाले.
एकूण 77 हजार रुपयांचे बिल पाहून लियाना यांचा सर्व शाही अंदाज उडून गेला. नंतर त्यांनी कबूल केले की त्यांना वाटले की 40 हजार रुपये बिल येईल असे वाटले होते. परंतू जर रेट माहिती असते तर मी इतके महागडी ड्रींक्स मागविली नसती. मलाही रेट असलेले मेन्यू कार्ड द्यायला हवे होते असे त्या म्हणाल्या.
येथे पोस्ट वाचा –
View this post on Instagram
यावर युजर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे जर माझ्या गर्लफ्रेंडला असे मेन्यू कार्ड दिले तरी तिने सर्वात महागड्या डीशचा शोध घेतलाच असता. अन्य एका युजरने लिहिलेय की अमेरिकेतही हा नियम आणा यार, किमान पुरुषांना तरी कळेल की खिसा किती खाली होणार आहे. या स्थितीत तुम्ही काय केले असते ?
