VIDEO | ही गाय तर माणसांपेक्षा हुशार, दरवाजा उघडून फरार, पाहा व्हिडीओ

VIDEO | गाईला सुध्दा दरवाजा उघडता येतो, आता कुलूप लावावं लागणार, व्हिडीओ लोकांच्या पसंतीला

VIDEO | ही गाय तर माणसांपेक्षा हुशार, दरवाजा उघडून फरार, पाहा व्हिडीओ
Cow Escaped By Opening Door With Tongue
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 09, 2023 | 7:58 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ (VIDEO) चांगलाचा व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक गाय गोठ्यात आहे. गोठ्याला बाहेरून लोखंडी दरवाजा करण्यात आला आहे. त्या दरवाजाची कडी गाय तोंडाने उघडून बाहेर येत आहे.
(Cow Escaped By Opening Door With Tongue) हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोकांच्या पसंतीला सुध्दा पडला आहे. काही लोकांनी कमेंटमध्ये ही गाय माणसांपेक्षा हुशार असल्याचं म्हटलं आहे.

प्राण्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. त्यापैकी चांगले व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडत असतात. नुकताच गाईचा व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे असं लोकं कमेंट करुन सांगत आहेत.

नेमकं व्हिडीओत काय आहे

गाईच्या गोठ्याला बाहेरुन लोखंडी दरवाजा आहे. त्याला कडी सुध्दा लोखंडी करण्यात आली आहे. गाईला कडी कशी खोलायची माहित असल्यामुळे, गाय ती कडी जिभेच्या साहय्याने उघडून स्वत:चं गोठ्यातून बाहेर पडत आहे. हा व्हिडीओ कोणत्या परिसरातील आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

@TheFigen_ या युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर व्हेरी स्मार्ट असं कॅप्शन देण्यात आलं आहे. आतापर्यंत चार लाख लोकांनी तो व्हिडीओ पाहिला असून 22 हजार लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. एकाने तर कमेंटमध्ये एक भाषा तुमच्यासाठी दरवाजा खोलत असते असं लिहिलं आहे.