अबब…चाळीशी पर्यंत ‘या’ महिलेने ४४ मुलांना दिला जन्म, नवरा घरातून पळाला

एका महिलेने वयाच्या 40 व्या वर्षी तब्बल 44 मुलांना जन्म दिल्याचा विक्रम केला आहे. खूप मुले झाल्यामुळे तिची वैद्यकीय स्थिती बिघडली होती,विशेष म्हणजे डॉक्टरांनीच तिला मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला होता. ही महिला कोण आहे? एवढी मुले जन्माला घालण्याचे कारण काय होते? याबाबतची माहीती जाणून घ्या.

अबब...चाळीशी पर्यंत 'या' महिलेने ४४ मुलांना दिला जन्म, नवरा घरातून पळाला
marim nambtaji
Image Credit source: you tube
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 27, 2022 | 7:17 PM

प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं असतं. काही महिला आई बनू न शकल्यामुळे आयुष्यभर दु:खी राहतात, पण या जगात अशाही काही महिला आहेत, ज्यांनी अधिक मुलांना जन्म देऊन विक्रम केला आहे. अशी एक महिला आहे, जिने वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत 44 मुलांना जन्म दिला आहे. जेव्हा या महिलेने गर्भनिरोधकाबाबत (About contraception) विचार केला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की कुटुंब नियोजनाची (Family planning) कोणतीही पद्धत तिच्यासाठी काम करणार नाही. या सोबतच मुलांना जन्म देणे बंद केल्यास तिला गंभीर आजार (Serious illness) होऊ शकतात किंवा मृत्यूही होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला होता. यानंतर या एकट्या महिने तब्बल 44 मुलांना जन्म दिला आहे. ती, तेव्हा पासुन या सर्व मुलांचा सांभाळ करत आहे. जाणून घ्या, कोण आहे ही महिला कोण आणि कोणत्या कारणाने तिने दिला इतक्या अधिक बालकांना जन्म.

कोण आहे ही महिला जिने 44 मुलांना जन्म दिला

Nypost नुसार, 44 मुलांना जन्म देणाऱ्या आईचे नाव मरियम नबतांझी आहे, ती पूर्व आफ्रिकेतील युगांडा येथील मुळ रहिवासी आहे. ती, आता 43 वर्षांची आहे आणि वयाच्या 40 व्या वर्षी तिने 44 मुलांना जन्म दिला होता. मरियमने फक्त एकदाच एका मुलाला जन्म दिला. याशिवाय चार वेळा जुळ्या, पाच वेळा तीन आणि चार वेळा पाच मुलांना जन्म दिला. अशा प्रकारे तिने तब्बल 44 मुलांना जन्म दिला परंतु, काही कारणांनी तिच्या सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिवंत असलेल्या 38 मुलांपैकी 20 मुले आणि 18 मुली आहेत, ज्यांना ती एकटीच वाढवत आहे.

वयाच्या 12 व्या वर्षीच झाले लग्न

मरियम 12 वर्षांची असताना तिच्या पालकांनी तिला लग्न लावून देण्याच्या बहाण्याने विकले. वयाच्या 13 व्या वर्षी तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर, मेरीयमला समजले की तिची प्रजनन क्षमता इतर स्त्रियांपेक्षा जास्त आहे. तेव्हा, तिला खूप मुले होतील. ती डॉक्टरकडे गेली आणि नंतर डॉक्टरांनी तिला वैद्यकीय स्थितीबद्दल सांगितले. डॉक्टरांनी मरियमला सांगितले की, तिची अंडाशय असामान्यपणे मोठी आहे, ज्यामुळे तिच्या शरीरात हायपरओव्हुलेशन नावाची स्थिती निर्माण झाली आहे. हायपर-ओव्हुलेट स्थिती अनुवांशिक आहे. या परिस्थितीत, अधिक मुले होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

त्यामुळे अनेक मुले जन्माला आली

युगांडाची राजधानी कंपाला येथील मुल्गो हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ चार्ल्स किग्गुंडू यांच्या मते, मरियमची प्रजनन क्षमता खूपच जास्त होती, ज्यामुळे ती इतक्या मुलांना जन्म देत होती. मरियमच्या स्थितीत कोणतेही गर्भनिरोधक तंत्र काम करणार नाही आणि असे केले तरी तिला गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. हायपरओव्हुलेशनवर उपचार असले तरी युगांडाच्या ग्रामीण भागात अशी अत्याधुनीक वैद्यकीय तंत्रे उपलब्ध होणे कठीण होते.

2016 मध्ये नवराही गेला पळून

मरियमचा पती 2016 मध्ये घरातून सर्व पैसे घेऊन पळून गेला होता. त्याच वर्षी तिने सर्वात लहान मुलाला जन्म दिला. उत्तर कंपालापासून ३१ मैलांवर असलेल्या शेतांनी वेढलेल्या गावात मरियम तिच्या मुलांसोबत राहते. मरियम आपल्या मुलांसोबत सिमेंटच्या चार घरांमध्ये राहते. मरियमच्या पतीला सोडल्यानंतर एका महिलेने तिला काही बेड दिले. मरियम आणि मुले त्यांच्यावर झोपतात. दोन मुले एका गादीवर झोपतात. मरियम तिचा सर्व वेळ मुलांची काळजी घेण्यात आणि पैसे कमवण्यात घालवते. तिने आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत, ज्यात कापणे, रद्दी गोळा करणे, औषध विकणे, लोकांची इतरही कामे करुन देत येणार्या उत्पन्नातून ती आपला व मुलांचा उदनिर्वाह चालवते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें