Video: प्रेयसीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण चढला विजेच्या खांबावर, म्हणाला पूजा आय लव्ह यू…

प्रियकराने प्रेयसीचा होकार मिळविण्यासाठी अनेकदा अशा आयडिया केल्या आहेत

Video: प्रेयसीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण चढला विजेच्या खांबावर, म्हणाला पूजा आय लव्ह यू...
Viral video
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 23, 2022 | 12:22 PM

मुंबई : लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करीत असतात. काहीजण पाण्याच्या टाकीवर चढतात, काहीजण विशाल झाडावर चढतात. तर काहीजण विद्युत तारेच्या (electric pole) खांबावरती चढतात. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे. त्यामध्ये एका तरुणाने विद्युत खांबावर चढून प्रेयसीला कॉल केला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, लोकांच्यासाठी मजेचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे तरुण ज्यावेळी विद्युत खांबावर चढला. त्यावेळी त्याच्या हातात मोबाईल होता. त्या मोबाईलवरुन कॉल करुन तो जोरात ओरडून पूजा आय लव्ह यू असं म्हणत आहे. कॉल केलेली व्यक्ती कदाचीत त्याची प्रेयसी असण्याची शक्यता आहे.

_itz_sonu_beawar या व्यक्तीने त्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ज्यावेळी तरुण विद्युत तारेच्या खांबावर चढला. त्यावेळी त्या परिसरात असलेली लोकं प्रचंड घाबरली होती. कारण विद्युत तारेला हात लागल्यानंतर मोठा धोका होण्याची शक्यता असते. तो व्हिडीओ अधिक व्हायरल झाला असून त्याला आतापर्यंत 70 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्यावर कमेंट सुद्धा अधिक आल्या आहेत.

प्रियकराने प्रेयसीचा होकार मिळविण्यासाठी अनेकदा अशा आयडिया केल्या आहेत. परंतु अशा प्रकारामध्ये अनेकदा तरुणांचा जीव सुद्धा गेला आहे.