AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये 40 वर्षीय व्यक्तीने मुलीकडे मागितली लोअर सीट, मुलीने दिलं असं उत्तर की तो थेट त्याच्या जागेवर बसला

40 वर्षाच्या व्यक्तीने रेल्वेमध्ये एका मुलीकडे मागितली लोअर सीट. मात्र, मुलीने थेट दिला नकार. म्हणाली मी माझी सीट तुम्हाला देते पण...

ट्रेनमध्ये 40 वर्षीय व्यक्तीने मुलीकडे मागितली लोअर सीट, मुलीने दिलं असं उत्तर की तो थेट त्याच्या जागेवर बसला
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 16, 2026 | 5:19 PM
Share

अनेकदा रेल्वे प्रवासात लोअर बर्थवरून प्रवाशांमध्ये वाद होण्याच्या घटना समोर येतात. मात्र, एका तरुणीने अशाच प्रसंगात भांडण न करता भन्नाट युक्ती वापरून आपली सीट परत मिळवली. राजेंद्रनगर ते हावडा या मार्गावर प्रवास करताना एका सहप्रवाशाने तिच्या लोअर बर्थवर कब्जा केला होता. वरच्या बर्थवर चढता येत नसल्याचे कारण देत तो प्रवासी खालील सीट सोडण्यास तयार नव्हते. अखेर तरुणीने त्यांना असा प्रस्ताव दिला की, काही क्षणांतच त्यांचा त्रास दूर झाला आणि ते स्वतःच्या बर्थवर जाऊन बसले. हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘नींद की रानी’ नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर या तरुणीने आपल्या रेल्वे प्रवासातील अनुभव शेअर केला. ती राजेंद्रनगर टर्मिनलवरून हावड्याकडे जाणाऱ्या थर्ड एसी डब्यातून प्रवास करत होती. रात्री सुमारे 10 वाजता ट्रेन खुसरूपूर स्थानकावर थांबली असताना ती दोन मिनिटांसाठी खाली उतरली. तिची बॅग सीटवरच होती. मात्र, परत आल्यावर तिला तिच्या जागेवर सुमारे 40 वर्षांचा एक व्यक्ती बसलेला दिसला. तिची बॅगही उचलून वरच्या साइड अपर बर्थवर ठेवण्यात आली होती.

‘मला वरच्या बर्थवर चढता येत नाही’

तरुणीने संबंधित व्यक्तीला आपली सीट असल्याचे सांगून खाली बसण्याचे कारण विचारले. त्यावर त्याने, ‘बेटा, माझी वरची सीट आहे. तू तिथे जा,’ असे सांगितले. वरच्या बर्थवर चढता येत नसल्याचे कारण देत त्याने खालील सीट सोडण्यास नकार दिला.

मात्र, तरुणीनेही आपली अडचण स्पष्ट केली. आरामदायी प्रवासासाठी तिने 925 रुपये खर्च करून ही सीट आरक्षित केली होती. त्यामुळे कोणतेही योग्य कारण नसताना आपली जागा का सोडावी असा तिचा प्रश्न होता.

तरुणीने मागितले 500 रुपये

तो व्यक्ती ऐकण्यास तयार नसल्याचे पाहून तरुणीने अनोखी युक्ती वापरली. ती म्हणाली, ‘काका, तुम्हाला माझी सीट हवी असेल, तर माझ्या तिकिटाच्या भाड्यातून मला 500 रुपये द्या आणि ही सीट घ्या.’

हे ऐकताच संबंधित व्यक्ती संतापला. ‘पैशांसाठी तू स्वतःची सीट सोडशील का?’ असा सवाल त्याने केला. त्यावर तरुणीने स्पष्ट उत्तर दिले, ‘मी माझ्या आवडीच्या सीटसाठी पैसे दिले आहेत. मग कोणतेही कारण नसताना ती तुम्हाला मोफत का द्यावी?’ तरुणीचे हे उत्तर ऐकल्यानंतर त्या व्यक्तीने अधिक वाद न घालता आपली बॅग घेतली आणि स्वतःच्या वरच्या बर्थवर जाऊन झोपणे पसंत केले. त्यामुळे तरुणीला तिची आरक्षित सीट परत मिळाली.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?