AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा ‘सिंघम’ इफेक्ट! मुंबईत स्ट्रीट फूडची पाहणी करणाऱ्या तरुणाचा VIDEO तुफान व्हायरल

Tukaram Mundhe: मुंबईतल्या स्ट्रीट फूड आणि विशेष म्हणजे शोवरमाबद्दल एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्णयांनंतर काय बदल झाला आहे, याविषयी त्याने त्यात सांगितलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा 'सिंघम' इफेक्ट! मुंबईत स्ट्रीट फूडची पाहणी करणाऱ्या तरुणाचा VIDEO तुफान व्हायरल
तुकाराम मुंढेImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 18, 2026 | 3:32 PM
Share

कडक शिस्त आणि धडक कारवाया, निर्णयांसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तीपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धडक कारवायांचं सत्रच सुरू ठेवलं आहे. याचा परिणाम विविध ठिकाणी प्रत्यक्षात पहायलाही मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर मुंबईतील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या ठिकाणी झालेल्या बदलांची एका तरुणाने पाहणी केली. या पाहणीनंतरचा अनुभव त्याने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे सांगितला. तरुणाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित तरुणाने काही ठिकाणी जाऊन परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत, परिसरातील स्वच्छता आणि विक्रेत्यांकडून घेतली जाणारी खबरदारी याकडे त्याने लक्ष दिलं. या पाहणीनंतर त्याने तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा सकारात्मक परिणाम जाणवत असल्याचं सांगितलं. “तुकाराम मुंढे सर.. तुम्हाला सॅल्यूट. शोरमाच्या स्टॉल्सवरील चिकनचा रंगच बदलला आहे. स्वच्छताही पहायला मिळतेय. कालच मी अफजल इथं खायला गेलो होतो. तिथला खेपसा खाल्ल्यानंतर हातावर जणू मेहंदीसारखाच लाल रंग यायचा. इतकं फूड कलर त्यात वापरलं जायचं. आता काहीच रंग हाताला लागला नाही”, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. कठोर निर्णय घेणारे आणि नियमांची अंमलबजावणी करण्यावर भर देणारे आदर्श, प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कोणतीही चर्चा सोशल मीडियावर लगेच चर्चेत येते.

पहा व्हिडीओ-

मुंबईतील स्ट्रीट फूड हा शहराच्या संस्कृतीचा जणू एक भागच आहे. वडापाव, पाणीपुरीपासून भेळ, शोरमापर्यंत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मुंबईत रस्त्याच्या कडेला मिळतात. मात्र चव, स्वस्त दर यांसोबतच स्वच्छता आणि अन्नाची सुरक्षितता हा मुद्दाही तितकाच महत्त्वाच आहे. याच पार्श्वभूमीवर एफडीएकडून खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी तपासणी आणि कारवाई केली जात असल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. ‘त्यांच्याप्रती खूप आदर आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुकाराम मुंढे हे खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. या व्हिडीओला 84 लाखांहून अधिक व्ह्यूज, 6 लाख 80 हजारांहून लाइक्स आणि तीन हजारांहून अधिक कमेंट्स मिळाले आहेत.

Follow Us
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?