AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात थेट बैल घुसले, पुढे जे घडले ते..

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. थेट बैलांनी अशी काही करामत केली की, सर्वजण फक्त बघतच राहिले.

सरकारी रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात थेट बैल घुसले, पुढे जे घडले ते..
MP
| Updated on: Oct 23, 2026 | 10:42 AM
Share

उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्हा रूग्णालयातून एक धक्कादायक व्हीडीओ समोर आला असून त्यामध्ये चक्क दोन बेवारस बैल आपत्कालीन विभागात घुसल्याचे दिसत आहे. हे बैल बघून दवाखाण्यात उपचारासाठी दाखल रूग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिवाय अचानक घुसलेले दोन बैल पाहून जिल्हा रूग्णालयातील उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. मात्र या सगळ्या घटनेवरून जिल्हा रूग्णालयातील रूग्णांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. सरकारी रूग्णालये नागरिकांना चांगले उपचार घेण्यासाठी उभारण्यात आली असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार नसेल तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित रूग्णांच्या नातेवाईकांकडून विचारण्यात आलाय. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान अथवा जिवित हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दोन बेवारस बैल जेंव्हा महोबा जिल्हा रूग्णालयात घुसले तेंव्हा आपत्कालीन विभागाच्या दारावर रूग्णांच्या नातेवाईकांना दिसले. त्यांनी त्या बैलाना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील एकाने सगळ्यांना हुलकावनी देत आत प्रवेश केला. अचानक ओढावलेला धक्कादायक प्रसंग पाहून रूग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली खरी पण त्या बैलाला बाहेर कोण काढणार हा प्रश्न निर्माण झाला. त्याचवेळी एक कर्मचारी समोर आला त्याने आपले धाडस दाखवत बेवारस बैलाला बाहेर काढले आणि पुढचा मोठा अनर्थ टळला.

अधिकाऱ्यांनी समोर येवून उत्तर देणं टाळलं महोबा जिल्हा रूग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर रूग्णालय प्रशासनाची बाजू घेण्याचा प्रयत्न झाला मात्र कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याकडून उत्तर देण्यात आलं नाही. मात्र या घटनेचा जो व्हीडीओ व्हायरल होतोय त्यावरून सोशल मिडीयावर मोठी चर्चा रंगलीय आणि सरकारी दवाखाण्यातील सुरक्षेवर प्रश्न विचारला जातोय.

रूग्णांच्या सुरक्षेची काळजी घ्या, नातेवाईकांची मागणी जेंव्हा ही घटना घडली तेंव्हा एका रूग्णाचा नातेवाईक ब्रजराज सिंह याने हा सगळा प्रकार बघितला आणि त्यांनी सांगितलं की, आमच्या समोर दोन बैल आपत्कालीन विभागात घुसले तेंव्हा आम्हाला वाटले आता खूप मोठी हानी होणार पण सुदैवाने तसे काही घडले नाही. या घटनेवरून सरकारी रूग्णालयांनी बोध घेवून रूग्णांच्या सुरक्षेची कडेकोट काळजी घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ