Video : विदेशी तरूणीकडे लिप किस प्लीज मागणं पडलं महागात; व्हिडिओ व्हायरल होताच..
दरवर्षी लाखो पर्यटक उदयपूर फिरायला येतात. असेच उद्यपूर फिरायला आलेल्या एका विदेशी यूट्यूबरसोबत असा काही विचित्र प्रकार घडला आहे की तिचा व्हिडिओमुळे एका तरूणाला जेलमध्ये जावे लागले आहे.

उदयपूर म्हणजेच भारताच्या संस्कृतीमधला एक राजेशाही थाट, शाही पाहुणचार, गड किल्ले हे सगळ पाहायला आणि अनुभवाला दरवर्षी लाखो पर्यटक उदयपूर फिरायला येतात. असेच उद्यपूर फिरायला आलेल्या एका विदेशी यूट्यूबरसोबत असा काही विचित्र प्रकार घडला आहे की तिचा व्हिडिओमुळे एका तरूणाला जेलमध्ये जावे लागले आहे.
राजस्थान फिरायला आलेली तरूणी रात्रीच्या वेळी लाईव्ह स्ट्रिमींग करत होती. तेवढ्यात एक तरूण तिच्याजवळ आला, अन् थेट लिप किसची मागणी केली. विशेष म्हणजे तिनं स्पष्ट नकार दिल्यानंतरही तो वारंवार हट्ट करत राहिला. हा संपूर्ण प्रकार त्या तरूणीच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
या यूट्यूबरचं नाव जस्टकेथ असून ती थाई – फ्रेंच वंशाची आहे. ती उदयपूरमध्ये फिरत असताना रात्री लाईव्ह स्ट्रिमिंग करत होती. त्याचवेळी एक तरूण तिच्याजवळ आला. व्हायरल व्हिडिओमध्ये तो तिला ‘वन लिप किस प्लीज, वन लिप किस प्लीज असं म्हणताना स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्याची मागणी ऐकताच तरूणीने स्पष्ट नकार दिला. मात्र ती नकार देत असतानाही तो पुन्हा पुन्हा किसची मागणी करू लागला. त्यामुळे ती अस्वस्थ झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही वेळानंतर त्याच तरूणानं तिच्यासोबत फोटो काढण्यासाची इच्छा व्यक्त केली. त्यावर विदेशी तरूणीने होकार दिला. त्यानंतर तरूणानं तिच्याशी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. पण तरूणीने हात न मिळवता फक्त हाताची मूठ पुढे केली.
हा व्हिडिओ जस्टकेथन इन्स्टग्रामवर शेअर केला. त्यासोबत तिनं ‘at least he asked’ असं कॅप्शन दिलं. हा व्हिडिओला 50 लाखांहून अधिक लोकांनी बघतले. कमेंट सेक्शनमध्ये प्रचंड राग व्यक्त केला. अनेकांनी त्या तरूणाच्या वतीने विदेशी तरूणीची माफी मागीतली.
दरम्यान हा व्हिडिओ पोलिंसाकडेही पोहोचला. पोलिंसांनी तात्काळ तपास सुरू केला. अखेर या तरूणाची ओळख आफताब उर्फ गब्बर अशी पटली. तो रिक्षाचालक असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात सूरजपोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचा सन्मान याबाबत पोलिसांनी कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
भारातात फिरायला आलेल्या विदेशी तरूणींना सुरक्षित वाटावं ही आपली जबाबदारी आहे. तिच्यासोबत असा काही व्यवहार करणं आपल्या देशाला लाज वाटणारी गोष्ट आहे.