AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाळीव कुत्र्यासाठी इतकं कोण करतं, तेराव घातलं, श्रद्धांजलीचे कार्ड, ब्राह्मणभोजन अजून काय, काय..

कुटुंबाने बफीचं पालनपोषण केलं. या श्वानाचा मिश्रा कुटुंबाला लळा लागला होता. त्याने सुद्धा मिश्रा कुटुंबाला जीव लावला. घरातील त्याची उपस्थिती त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेली.

पाळीव कुत्र्यासाठी इतकं कोण करतं, तेराव घातलं, श्रद्धांजलीचे कार्ड, ब्राह्मणभोजन अजून काय, काय..
buffi
| Updated on: Oct 19, 2026 | 3:13 PM
Share

ज्या घरात श्वान पाळतात तिथे त्याला घरच्या सदस्यासारखा दर्जा असतो. घरातल्या एखाद्या सदस्याला ज्या प्रमाणे हवं-नको ते पाहिलं जातं, तशी श्वानांची काळजी घेतली जाते. काही घरांमध्ये श्वान इतका प्रिय असतो की, त्याच्या देखभालीसाठी लाखो, कोट्यवधींची संपत्ती मागे सोडली जाते. अशी अनेक उदहारण आपण पाहिली आहेत. उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाने तर चक्क यापुढे जात आपल्या लाडक्या कुत्र्‍यासाठी चक्क तेरावं घातलं. त्याला अखेरचा निरोप देताना कुठलीही कसर सोडली नाही. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील हे कुटुंब आहे. त्यांनी आपल्या लाडक्या बफीच्या स्मृतीप्रित्यर्थ चक्क त्याचं तेरावं घातलं. बफीच्या तेराव्याच्या स्मरणार्थ कार्ड छापून ब्राह्मणभोजन आयोजित केलं. एका मुक्या जनावराप्रती या कुटुंबाचं प्रेम सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

बफीने जवळपास सात वर्ष या कुटुंबासोबत घालवली. गोरखपूर आझाद नगरमध्ये राहणारे अनिल मिश्रा यांच्या कुटुंबाने बफीचं पालनपोषण केलं. या श्वानाचा मिश्रा कुटुंबाला लळा लागला होता. त्याने सुद्धा मिश्रा कुटुंबाला जीव लावला. घरातील त्याची उपस्थिती त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेली. मिडिया रिपोर्ट्नुसार 2 ऑक्टोबरला बफीचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. बफी मिश्रा कुटुंबासाठी फक्त पाळीव प्राणी नव्हता. त्यांनी बफीला आपल्या घरचं सदस्य मानलं होतं. म्हणून बफीच्या मृत्यूनंतर त्याला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

दहाव्यादिवशी मुंडनाचा विधी झाला

बफीची आठवण म्हणून कुटुंबाने श्रद्धांजली कार्ड छापले. कार्डाच्या माध्यमातून नातेवाईक आणि कुटुंबियांना तेराव्याच्या भोजनासाठी निमंत्रित करण्यात आलं. आपल्या प्रिय कुत्र्यावर प्रेम व्यक्त करण्याचा हा क्षण त्यांनी खास बनवला. बफीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रीतसर तेराव्याचे सर्व विधी केले. दहाव्यादिवशी मुंडनाचा विधी झाला. तेराव्याला ब्राह्मण भोजन ठेवण्यात आलेलं. कार्यक्रमाला लोकांना भोजन देण्यात आलं. सुंदरकांड पाठ सुद्धा झाला.

या नात्याचा सन्मान केला

घरातल्या पाळीव जनावरासोबत एक भावनात्मक नातं तयार होतं. त्याच्यासोबत काढलेली वर्ष, त्याच्या सवयी आणि घरातील त्याची उपस्थिती आयुष्याचा एक भाग बनून जाते. अशावेळी त्याच्यापासून होणारी ताटातूट सुद्धा माणसाच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. गोरखपूरचच्या मिश्रा परिवाराने तेरावं घालून या नात्याचा सन्मान केला. आपलेपणा फक्त माणसांपुरता नाही, तर मुक्या जनावरांप्रती सुद्धा असू शकतो.

Follow Us
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये