AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलसाठी 30 फुटांवरून नदीत कुदला, पायाचा x-ray बघा…

पुष्पेंद्र असं या युवकाचं नाव आहे. रिल बनवण्यासाठी म्हणून तो रविवारी मित्रांसोबत पाहुज धरणावर गेला होता. कॅमेऱ्यासमोर थरारक स्टंट रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून तो टोकावर उभा होता.

रिलसाठी 30 फुटांवरून नदीत कुदला, पायाचा x-ray बघा...
Man 30 Feet Into Dam For Reel
| Updated on: Sep 08, 2026 | 5:01 PM
Share

काही सेकंदाच्या रिलसाठी 30 फूट उंचावरुन धरणात उडी मारणं एका तरुणाला चांगलचं महाग पडलं आहे. उत्तर प्रदेशात सोशल मीडियावर रिल पोस्ट करण्यासाठी तरुणाने हे उद्योग केले. पाण्यात डुंबण्यासाठी म्हणून त्याने उडी मारली पण तो खडकावर आदळला. झांसीच्या पाहुज धरणावरची ही घटना आहे. पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे या 38 वर्षीय व्यक्तीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. पुष्पेंद्र असं या युवकाचं नाव आहे. रिल बनवण्यासाठी म्हणून तो रविवारी मित्रांसोबत पाहुज धरणावर गेला होता. कॅमेऱ्यासमोर थरारक स्टंट रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून तो टोकावर उभा होता. जवळपास 30 फूट उंचीवरुन त्याने धरणात उडी मारली.

पाण्याची पातळी कमी असल्यामुळे खोल पाण्यात जाण्याऐवजी पुष्पेंद्र खडकावर आदळला. त्याच्या दोन्ही पायाला मार लागला. खडकावर आदळल्यानंतर त्याला इतका जबर मार लागला की, तो स्वत:च्या पायावर उभा राहून पाण्याबाहेरही येऊ शकत नव्हता. त्याला उभही राहता येत नव्हतं. तो बुडण्याची भिती होती. हाताच्या आधारे तो कसाबसा तिथे टिकून राहिला. तरंगतच कसाबसा तो सुरक्षित जागी पोहोचला. लोकांनी त्याला लगेच बाहेर काढलं. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते लगेच घटनास्थळी पोहोचली.

तुझ्या आत्म्याला शांती मिळो

त्याला लगेच उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी एक्स रे रिपोर्ट तपासल्यानंतर पुष्पेंद्रचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. त्याच्या एका पायात रॉड टाकला. दुसऱ्या पायावरची शस्त्रक्रिया अजून बाकी आहे. हे सर्व घडत असताना पुष्पेंद्रचा मित्र या धोकादायक स्टंटचं शूटिंग करत होता. धरणात उडी मारण्याच्या काही क्षण आधीचे व्हिडिओत रेकॉर्ड झाले आहेत. तुझ्या आत्म्याला शांती मिळो असं गंमतीने हा मुलगा बोलताना दिसतो. जीव धोक्यात घालून रिल बनवण्याचे काय परिणाम आहेत ते या व्हिडिओतून दिसतं.

Follow Us
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात