Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

या लग्नाच्या व्हिडीओमध्ये आधी मुलगा मिशीला पिळ देतो, पण जेव्हा बायकोसमोर बसतो, तेव्हा तिच्या ताटाखालचं मांजर होतो.

Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल
आधी मुलगा मिशीला पिळ देतो, पण जेव्हा बायकोसमोर बसतो, तेव्हा तिच्या ताटाखालचं मांजर होतो.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 05, 2021 | 3:26 PM

लग्नाआधी मुलगा स्वत:ला सिंह समजत असतो, पण लग्न झाल्यानंतर तो बायकोचं मांजर होतो. बरेच लोक लग्नाबद्दल असं बोलत असतात. बहुतेकांचे ते अनुभवही असतात. एवढ्यावरच हे थांबत नाही तर मुलगा बायकोचं सगळं ऐकतो अशी तक्रार मुलाची आई सतत करताना पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, या लग्नाच्या व्हिडीओमध्ये आधी मुलगा मिशीला पिळ देतो, पण जेव्हा बायकोसमोर बसतो, तेव्हा तिच्या ताटाखालचं मांजर होतो. (Video of the bride and groom at the wedding goes viral on Instagram)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या काहीवेळा आधी वरमुलगा कॅमेऱ्यासमोर मिशांना पिळ देतो आणि आपला तोरा दाखवतो. पण, त्याच्याच काही मिनिटानंतर हा मुलगा जेव्हा वधुसमोर येतो, तेव्हा त्याचा तो तोरा पूर्ण मावळलेला असतो. तो तिला शांतपणे मंगळसूत्र घालतो, आणि त्यानंतर तिच्या गालावर चुंबन देतो. लग्नानंतर झालेला जोरुचा गुलाम या व्हिडीओ स्पष्ट दिसतो

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फार आवडताना दिसत आहे. वधू-वराची जोडीही शोभणारी आहे. वधू अतिशय शांत आणि स्मित दिसते आहे, तर वर हा आधी खोडकर पण बायकोसमोर आल्यानंतर एकदम सोज्वळ असल्याचा भास निर्माण करतो. या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप पाहिला जात आहे. लोकांकडून या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. लोक आपली संस्कृती आणि आपल्या आठवणी या प्रसंगाशी जोडून पाहतात.

हेही पाहा:

View this post on Instagram

A post shared by Yuvan (@yuvanphotography)

Video: लग्नातच नवरा फुगला, नवरीही रागाने लाल, नवरी-नवऱ्याला मिठाई भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Video: लग्नात वराने वधूच्या हातात दिली बंदूक, फायरिंग केल्यानंतर काय घडलं पाहा!

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें