Viral Video : दोस्त असावा तर असा! गायींच्या गराड्यात श्वान बनला साथी, केलं चिमुकलीचं संरक्षण…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Apr 05, 2022 | 12:07 PM

Viral Vodeo : एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात कुत्रा एका लहान मुलीची मदत करतोय. तिचं गायीच्या हल्ल्यापासून संरक्षण करतोय.

Viral Video : दोस्त असावा तर असा! गायींच्या गराड्यात श्वान बनला साथी, केलं चिमुकलीचं संरक्षण...
गायींच्या गराड्यात श्वान बनला साथी, केलं चिमुकली संरक्षण. व्हीडिओ व्हायरल

मुंबई : आयुष्यात खरे मित्र (Friends) मिळणं हे सध्या कठीण झालंय. त्यातही मित्राने संकटसमयी आपली मदत करणं, दुर्मिळ झालंय. पण अश्या सगळ्या परिस्थितीत प्राणी हेच खरे मित्र असतात हे तुम्हाला पदोपदी जाणवत असेल. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय. ज्यात कुत्रा (Dog) एका लहान मुलीची (little girl) मदत करतोय. तिचं गायींच्या (Cows) हल्ल्यापासून संरक्षण करतोय. या व्हीडिओत लहान एक लहान मुलगी दिसतेय. तिच्याभोवती गायींचा गराडा पाहायला मिळतोय. या गायी तिच्यावर हल्ला चढवतात. पण इतक्यात तिचा सच्चा यार कुत्रा तिची मदत करतोय. तिचं या गायींपासून संरक्षण करतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात कुत्रा एका लहान मुलीची मदत करतोय. तिचं गायीच्या हल्ल्यापासून संरक्षण करतोय. या व्हीडिओत लहान एक लहान मुलगी दिसतेय. तिच्याभोवती गायींचा गराडा पाहायला मिळतोय. या गायी तिच्यावर हल्ला चढवतात. पण इतक्यात तिचा सच्चा यार कुत्रा तिची मदत करतोय. तिचं या गायींपासून संरक्षण करतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by American XL Bully Empire (@xlbully_empire)

कमेंट बॉक्स

चिमुरडी आणि तिच्या दोस्ताचा हा व्हीडिओ व्हायरल झालाय. American XL Bully Empire या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत हा व्हीडिओ आवडल्याचं सांगितलंय, या कुत्र्याचं कौतुक केलंय. कुत्र्यासारखा सच्चा मित्र नाही असं एकाने कमेंट करत म्हटलंय. तर दुसऱ्याने या मुलीचं कौतुक केलंय. तू या मित्रावर भरोसा केला, तुझं अभिनंदन असं आणखी एकाने म्हटलंय. कितीं सुंदर नातं आहे असं एक युजर म्हणाला आहे. तर आणखी एकजण म्हणला, हाच तुझा खरा संरक्षक आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातही जर व्हीडिओमधला विषय चांगला असेल तर तो सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. हा व्हीडिओ सच्च्या मित्राचं प्रेम दाखवतो, म्हणून याला अनेकांची पसंती मिळताना दिसतेय.

संबंधित बातम्या

क्कादायक! पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं, मानवतेला काळीमा फासणारी घटना

Video : “मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू…”, Jacqueline Fernandez झाली ‘सैराट’

Video : पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI