Video: घोर कलियुग…पोपटाने कुत्रीचं दूध पिलं, नेटकरी म्हणाले, आता हेच पाहायचं राहिलं होतं!

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म KOO वर शेअर करण्यात आला आहे. अंकुर मिश्राच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक केले आहे

Video: घोर कलियुग...पोपटाने कुत्रीचं दूध पिलं, नेटकरी म्हणाले, आता हेच पाहायचं राहिलं होतं!
पोपट कुत्रीचं दूध पितो

सोशल मीडिया हे असं ठिकाण आहे की, जिथं जे काही अपलोड केले जाते ते व्हायरल होणे निश्चितच असतं. हे असं व्यासपीठ आहे जिथे कधी, काय पहावे हे सांगणे कठीण होते? कधी-कधी अशा गोष्टीही समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सध्या असे प्राण्यांचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. ज्या व्हिडिओंबद्दल क्वचितच कोणी विचार केला असेल, ते व्हिडीओ असे आहेत की ते पाहून लोक थक्क होतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोपट आनंदाने कुत्र्याचे दूध पीत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत (viral video Funny video parrot drink dog milk amazing funny video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आरामात पडलेला दिसत आहे. तेवढ्यात एक पोपट तिथे पोहोचतो आणि मोठ्या आनंदाने कुत्र्याचे दूध पिऊ लागतो. एकदा कुत्रा उठतो आणि पाहतो, पण तो पोपटाला त्रास देत नाही आणि त्याला दूध पिऊ देतो. आम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पडेल की आजच्या काळात काहीही अशक्य नाही. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

येथे व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा-

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म KOO वर शेअर करण्यात आला आहे. अंकुर मिश्राच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक केले आहे, तर सोशल मीडिया यूजर्सनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. त्याचवेळी तुम्हा सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की हे कसे होऊ शकते?

लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, एका यूजरने कमेंट करत लिहिले, ‘किती सुंदर दृश्यं आहे. या 6 वर्षात महागाईमुळे पोपटावर ही काय वेळ आली’ आणखी एक युजर म्हणतो, ‘घोर कलियुग… आता पोपट कुत्र्याचं दूध पिणार, हाच दिवस उरला होता का?’ एका यूजरने लिहिलं, ‘मी असाच आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतरही विश्वास बसत नाहीये की, हा व्हिडीओ खरा आहे की कोणीतरी एडिट केला आहे.

हेही पाहा:

तरुणाचा जीव तोंडात आणणारा स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील, पाहा व्हिडीओ!

Video: स्कूटीवर भयानक स्टंट, तोल गेला आणि जीव जाता जाता राहिला, पाहा स्टंटचा लोटपोट करणारा व्हिडीओ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI