Video : ती आली, हवेत उडाली अन्… व्हायरल व्हिडिओचं रहस्य काय; तुम्हालाही समजणार नाही!
Viral Video : गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये घडलेली एक विचित्र घटनेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला असून यात एक तरूणी आश्चर्यकारकरित्या खाली कोसळली आहे.

सोशल मीडियावर नेहमी व्हायरल घटनांची चर्चा होत असते. अशातच आता गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये घडलेली एक विचित्र घटनेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एका इमारतीत अंजू, रितू आणि पिंकी या तीन तरुणी भाड्याने राहत राहतात. तिघीही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील रितूसोबत असं काही घडलं की, यामुळे नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास रितू कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती जिन्याने खाली उतरत असताना अचानक एक मांजर अतिशय वेगाने तिच्या समोरून धावत वरच्या दिशेने जाऊ लागले. रितू या मांजराकडे पाहत होती. मांजर रितूजवळून वर गेले, मात्र त्यानंतर भयंकर घडल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मांजरामुळे रितू घाबरते आणि त्यानंतर की ती रेलिंगवरून उलट पलटी मारून खाली कोसळते. ती अशाप्रकारे पडते जणू काही तिला कुणीतरी उचलून खाली फेकले आहे. खाली पडल्यामुळे दुखापत झाल्याने तिने मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी रितूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
रितू काय म्हणाली?
रुग्णालयात रितूला पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तिने मात्र वेगळीच घटना सांगितली. रितूच्या म्हणण्यानुसार, एक व्यक्ती काळ्या म्हशीवर बसून जिन्याच्या मार्गाने वर जात होता. मी त्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला धक्का दिला आणि त्यामुळे ती जिन्यावरून खाली पडली. रितूने दिलेली ही विचित्र माहिती ऐकल्यानंतर संबंधित व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्याने इमारतीतील जिन्यावर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांची फुटेज तपासली. फुटेज पाहिल्यानंतर संपूर्ण सत्य समोर आले आहे
रितूच्या म्हणण्यानुसार घडलेली घटना आणि CCTV मध्ये दिसणारे वास्तव यामध्ये मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले. या विचित्र घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, घाबरलेल्या अवस्थेत व्यक्तीला एखादा प्रसंग वेगळ्या पद्धतीने जाणवू शकतो, याची ही घटना उदाहरण ठरली आहे.