Video: लोक जग मुठीत बंद करण्याचा प्रयत्न करतात, हा चिमुरडा पाणी खिशात बंद करतोय, पाहा चिमुरड्याचा गोंडस व्हिडीओ!

टी-शर्ट घातलेले एक लहान मूल नळासमोर उभं आहे, ज्यातून पाणी पडत आहे. आधी तो नळावरून पडणाऱ्या पाण्याने हातपाय धुतो आणि मग अचानक नळासमोर त्याचा टी-शर्टचा खिसा उघडतो आणि त्यात पाणी भरू लागतो.

Video: लोक जग मुठीत बंद करण्याचा प्रयत्न करतात, हा चिमुरडा पाणी खिशात बंद करतोय, पाहा चिमुरड्याचा गोंडस व्हिडीओ!
लहान मुलाचा व्हायरल होणारा व्हिडीओ

सगळं जग आपल्या मुठीत बंद असावं, असं अनेकांना वाटत असतं. पण, जगज्जेत्यांनाही ते शक्य झालेलं नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका चिमुरड्याने चक्क पाण्याला आपल्या मुठीत बंद करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे. आतापर्यंत तुम्ही पाणी हे एखाद्या भांड्यात वा बाटलीत भरल्याचं पाहिलं असेल, पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत हा चिमुरडा चक्क पाणी आपल्या खिशात भरतो आहे, हा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुरड्याच्या गोंडसपणाचं कौतुक करत आहेत. (Viral video of child who started filling the water in pocket cute video viral)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टी-शर्ट घातलेले एक लहान मूल नळासमोर उभं आहे, ज्यातून पाणी पडत आहे. आधी तो नळावरून पडणाऱ्या पाण्याने हातपाय धुतो आणि मग अचानक नळासमोर त्याचा टी-शर्टचा खिसा उघडतो आणि त्यात पाणी भरू लागतो.

व्हिडीओ पाहा:

खरं तर मुलं खूप गोंडस असतात. प्रत्येक काम वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेकदा मुलांची ही कृत्य लोकांना आश्चर्यचकीत करतात तर कधी खूप हसवतात. असंच काहीसा प्रकार या व्हिडीओत दिसत आहेत. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर cute_baby_reel या नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 1 लाख 14 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केलं आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. स्पॅनिशमध्ये एका यूजरने लिहिले आहे की, ‘हेच खरं जीवन आहे’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, हे किती सुंदर मूल आहे. मुलांशी संबंधित असे सर्व व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील, जे खूप मजेदार आहेत आणि ज्यामध्ये मुले अनोख्या गोष्टी करताना दिसतात.

हेही पाहा:

Video: तारेवर लटकल्या मांजरीच्या पिलांची जुगाडाने सुटका, लोक म्हणाले, आम्हाला ‘इश्क’ सिनेमाचा तो सीन आठवला!

Video: संकटात पिलाला कुशीत कवटाळून घेणारी आई, माकडांचा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक!

Published On - 1:02 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI