Video: संकटात पिलाला कुशीत कवटाळून घेणारी आई, माकडांचा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक!

एक माकड, तेव्हा समोर बसलेल्या या पिल्लाचे डोके पकडून त्याला धक्काबुक्की करते. या माकडाने असं का केलं हे कळू शकत नाही, पण तितक्यात या माकडाची आई या पिल्लाला हल्ला करणाऱ्या माकडाच्या तावडीतून सोडवते.

Video: संकटात पिलाला कुशीत कवटाळून घेणारी आई, माकडांचा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक!
पिल्लाला वाचवणारी आई

सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे नेटकऱ्यांना खूप आवडतात, सध्या कुत्रा मांजराचे व्हिडीओ तर इंटरनेटवर खूप पाहिले जातात. हे असे व्हिडीओ असतात, जे पाहिल्यानंतर मन खूश होतं. पण कधी-कधी असे काही व्हिडिओही पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो तुम्हाला विचार करायला लावेल. हा व्हिडिओ माकडांच्या टोळीचा आहे. (A mother who saves her baby from other monkeys, video goes viral)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही माकडं एका जागी बसलेले आहेत, ज्यामध्ये माकडाचे एक पिल्लू देखील आहे. तेवढ्यात एक माकड, तेव्हा समोर बसलेल्या या पिल्लाचे डोके पकडून त्याला धक्काबुक्की करते. या माकडाने असं का केलं हे कळू शकत नाही, पण तितक्यात या माकडाची आई या पिल्लाला हल्ला करणाऱ्या माकडाच्या तावडीतून सोडवते. आणि त्याला तिच्या कुशीत लपवते, जेणेकरून कोणीही आपल्या मुलाला इजा करू नये. आईच्या प्रेमाचे हे एक अद्भुत उदाहरण आहे, जे माकडांमध्ये देखील दिसून येते. मानवांमध्ये, आपण अनेकदा पाहिले असेल की आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीही करते, परंतु माकडांमध्ये हे क्वचितच दिसून येते.

पाहा व्हिडीओ:

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा bhavanisingh2121 नावाच्या या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला 5 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेलं आहे, तर 62 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आई आईच असते, मग ते प्राणी असो वा माणूस’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ प्राणीही एकमेकांवर जळतात, मग माणसाचं काम म्हणायचं’.

हेही पाहा:

आनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी

मी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन

Published On - 11:53 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI