मी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन

पती -पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असतात. मात्र या वादानंतर देखील दोघांमधील प्रेम कायम राहाते. अशाच एका वादाची  जोरदार चर्चा सध्या शोसल मिडीयावर  सुरू आहे. व्हेजिटेरियन असलेल्या पतीने आपल्या पत्नीला मी किंवा मटन या दोघांपैकी एक निवड असे सांगितले.

मी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन

नवी दिल्ली : पती -पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असतात. मात्र या वादानंतर देखील दोघांमधील प्रेम कायम राहाते. अशाच एका वादाची  जोरदार चर्चा सध्या शोसल मिडीयावर  सुरू आहे. व्हेजिटेरियन असलेल्या पतीने आपल्या पत्नीला मी किंवा मटन या दोघांपैकी एक निवड असे सांगितले. हा पती एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने एका वृत्तपत्रात आपली अडचण छापून त्यावर लोकांची मते देखील मागवली. हे वृत्तपत्राचे कंटिग सध्या भन्नाट व्हायरल होत असून, सोशल मीडियावर अनेक जण या पतीला सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे ही बातमी व्हायरल झाल्यानंतरही पत्नीने मटन खाणे सोडण्यास नकार दिला आहे.

लग्नपूर्वी पत्नी नॉनव्हेज खात असल्याचे माहित होते

ट्विटरवर प्रसिद्ध झालेले एक वृत्तपत्राचे कटिंग सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. हे कटिंग चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, पत्नीने  नॉनव्हेज खाने सोडावे अशी मागणी यामधून करण्यात आली आहे. पतीने त्यामध्ये म्हटले आहे की, त्याची पत्नी नॉनव्हेज खात असल्याने तो परेशान झाला आहे. लग्नपूर्वी आपली पत्नी नॉनव्हेज खाते हे मला माहित होते. मात्र लग्नानंतर मी नॉनव्हेज खाने सोडून देईल असा शद्ब माझ्या बायकोने मला दिला होता. मात्र लग्ननंतर देखील ती माझ्यापासून लपून नॉनव्हेज खात असल्याचे त्याने सांगितले. याचाच अर्थ तिने मला दिलेले वचन मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये मी काय करावे असा सवाल त्याने नेटिझन्सला विचाराला आहे. यावर आता नेटिझन्स देखील भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

पतीने म्हटले आहे की,  माझी पत्नी खूप सुंदर आहे, तीची सुंदरता बघूनच मी तिच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर तिने मी नॉनव्हेज खाणार नाही असे वचन दिले. मात्र आपल्याला नॉनव्हेज खूप आवडत असल्याने आपण ते सोडू शकत नसल्याचे तीने म्हटले आहे. यावर मी तिला नॉनव्हेज किंवा मी अशा दोन्हीपैकी एक ऑपशन निवडण्याचा पर्याय दिला असल्याचे पतीने सांगीतले. दरम्यान एका ट्विटर वापरकर्त्या महिलेने यावर कमेंट करताना म्हटले आहे की, संबंधित महिलेने पुरुषाचे वेतन बघून त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर पुरुषाने महिलेची सुंदरता पाहून तिच्याशी लग्न केले. दोघांमध्ये जर प्रेमच नसेल तर संसार कसा चालणार?

संबंधित बातम्या 

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस

Video: चालायला शिकण्याच्या वयात चिमुरड्याची रेसलिंग, लोक म्हणाले, हा भविष्यातील Hulk आहे!

Video: सोंड आणि कान हलवून हत्तीने केला मजेदार डान्स, लोक म्हणाले, असा क्युट डान्स पाहिला नाही!

Published On - 1:03 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI