AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: डिझेलच्या टाकीवर चित्रकाराची अनोखी कलाकारी, लोक म्हणाले, हेच खरे कलाकार आहेत!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ट्रकच्या डिझेल टाकीच्या मागे 'डिझेल' लिहिताना दिसत आहे, त्या व्यक्तीने हातात केशरी रंगाने भरलेले टिनचे डबे आहेत. तो एका छोट्या पेंट ब्रशने आपली कलाकारी दाखवताना दिसत आहे.

Video: डिझेलच्या टाकीवर चित्रकाराची अनोखी कलाकारी, लोक म्हणाले, हेच खरे कलाकार आहेत!
डिझेल टाकीवर कलाकारी दाखवणारा चित्रकार
| Edited By: VN | Updated on: Dec 03, 2021 | 9:00 AM
Share

सोशल मीडिया हे एक असं ठिकाण आहे, जिथं कुणीही रातोरात स्टार होऊ शकतो. सोशल मीडियाची ही ताकद आता सर्वांना माहित झाली आहे. त्यामुळेच सामान्य लोकही याच सोशल मीडियाच्या जोरावर पुढं आली आहेत, त्यातील अनेकजण स्टार झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराला भेटवणार आहोत, ज्याच्या कलेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो सोशल मीडियावर फेमस झाला. (Viral Video of Painter Man shows his talent on truck tank social media users surprised to see)

आपल्या सर्वांच्या घरी नवीन वाहन आले की, सर्वप्रथम आपण नारळ फोडतो किंवा पूजा करतो. त्याचप्रमाणे, नवीन कार खरेदी केल्यानंतर, ट्रक आणि ऑटो लोक प्रथम पेंटरकडे जातात आणि कारच्या मागे काहीतरी मजेदार लिहतात. कुणी देवाचं, कुणी आईवडीलांच तर कुणी काही लिहतं. भारतात ट्रक आणि टँकरसारख्या वाहनांच्या मागे कल्पकतेने लिहिलेली नावे म्हणजेच कॅलिग्राफी लोकांना खूप आवडते. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ट्रकच्या डिझेल टाकीच्या मागे ‘डिझेल’ लिहिताना दिसत आहे, त्या व्यक्तीने हातात केशरी रंगाने भरलेले टिनचे डबे आहेत. तो एका छोट्या पेंट ब्रशने आपली कलाकारी दाखवताना दिसत आहे. तो माणूस त्याच्या प्रचंड वेगाने टाकीवर ब्रश फिरवतो. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ही व्यक्ती काय बनवण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज लावता येत नाही, पण तो पेंटिंग पूर्ण करताच. काहीतरी अनोखे आणि मजेदार पाहायला मिळते. आपल्या अद्वितीय प्रतिभेने तो ‘डिझेल’ नावाने टाकी रंगवतो.

व्हिडीओ पाहा

@GabbbarSingh नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले होते तर, चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “मी हे पुन्हा पुन्हा पाहत आहे. बर्‍याचदा पाहिल्यानंतर मला समजले की, डिझेल लिहिले आहे. दुसर्‍याने लिहिले, “मी याकडे लक्ष देऊ पाहिलं, पणॉ कळालं नाही की, हे लिहिणे इतके सोपे कसं असू शकते? अशा अनेक कमेंट्स तुम्ही इथे पाहू शकता.

हेही पाहा:

Video: पाण्यात कासव आणि मगरीचं हात मिळवून ‘हाय-हॅलो’, नेटकरी म्हणाले, असा व्हिडीओ आधी पाहिला नाही

Viral: बर्फावर दोन पांडांची मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवलं त्यांचं बालपण!

 

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...