Viral: बर्फावर दोन पांडांची मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवलं त्यांचं बालपण!

पांडाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन पांडा बर्फाशी खेळताना दिसत आहेत. बर्फातल्या दोन्ही पांड्यांच्या मस्तीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

Viral: बर्फावर दोन पांडांची मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवलं त्यांचं बालपण!
पांडांची बर्फावर मस्ती

सोशल मीडियावर प्राण्यांचे लाखो फोटो आणि व्हिडिओ आहेत. प्राणीप्रेमी अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो, व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवतात. प्राण्यांची व्हिडीओ, फोटो इंटरनेटवर सर्वाधिक पाहिली जाणाऱ्या गोष्टी आहेत, असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. प्राण्यांचे काही व्हिडिओ इतके मजेदार आणि गोंडस असतात की, ते पाहिल्यानंतर तुमचे हसू आवरता येणार नाही. सध्या दोन पांडांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. (Amazing Video of Panda at snow enjoying on ice people will love this clip)

प्राणीप्रेमी प्रत्येक प्राण्यावर प्रेम करतात. त्यांच्या गोंडस कृत्यं त्यांना खूप आवडतात, परंतु बरेच प्राणी असे आहेत. ज्याच्यावर केवळ प्राणीप्रेमीच नाही तर प्रत्येकजणच प्रेम करतो. या सुंदर प्राण्यांपैकी एक पांडा आहे. ज्याचा गोंडसपणा खरोखर मनाला भिडणारा आहे. पांडाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन पांडा बर्फाशी खेळताना दिसत आहेत. बर्फातल्या दोन्ही पांड्यांच्या मस्तीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

हा व्हिडिओ पाहा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मोठा आणि एक छोटा पांडा बर्फावर आरामात पडलेला आहे, परंतु काही वेळाने लहान पांडा मोठ्या पांडाला त्रास देऊ लागला. यासाठी तो कधी चढावर चढतो, तर कधी तिथे तो बर्फाशी खेळताना दिसतो. लहान पांडाच्या ही कृत्यं पाहून लोक आनंदी झाले आहेत.

सोशल मीडियावर दोन्ही पांडांच्या मस्तीचा हा व्हिडीओ लोक लाइक करत आहेत. यावर अनेकांनी कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘लहानपणी मी माझ्या भावाचा असाच छळ करायचो.’ तर दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘पांडाची मजा प्रत्येक वेळी पाहण्यासारखी असते ‘ दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘छोटा पांडा जरा जास्तच खोडकर दिसत आहे.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हा क्यूट व्हिडिओ स्मिथसोनियनजू नावाच्या एका अकाउंटने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 34 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: ‘वडील वारले, व्हिसा हवाय’, म्हणणाऱ्या महिलेशी पाहा भारतीय अधिकारी कसा वागला? सोशल मीडियावर नेटकरी भडकले!

Video: गोणीवर बॅक फ्लिप आणि गोणी पाठीवर टाकून थेट गोदामात, कामात मजा घेणारा मजूर पाहून नेटकरी भारावले!

Published On - 4:19 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI