AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: दुबईतील प्रसिद्ध हॉटेलसमोर वाघासोबत स्टंट, नेटकरी भडकले, कमेंट्समध्ये नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक वाघ समुद्रकिनाऱ्यावर काही फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे

Video: दुबईतील प्रसिद्ध हॉटेलसमोर वाघासोबत स्टंट, नेटकरी भडकले, कमेंट्समध्ये नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
'लव्ह इन दुबई' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 11, 2021 | 4:41 PM
Share

दुबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ समोर शूट केलेल्या व्हिडिओवरुन आता सोशल मीडियावर वादळ तयार झालं आहे. या व्हिडिओमध्ये वाघाच्या वापराबद्दल नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत. हा व्हिडिओ lovindubai ने त्याच्या अधिकृत Instagram खात्यावर अपलोड केला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत काय दाखवलं आहे की ज्यामुळे नेटकरी संतापत आहेत, ते पाहुया.( Viral Video Tiger used for baby gender reveal in Dubai netizens are fuming)

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक वाघ समुद्रकिनाऱ्यावर काही फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे, तर त्याच्या मागे दुबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ दिसत आहे. ‘लव्ह इन दुबई’ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर असं लिहिले आहे की, ‘दुबईमध्ये अशा प्रकारे आपली ओळख करुन दिली जाते.’ वाघांसारख्या जंगली प्राण्यांच्या वापरावर नेटकरी भडकले आहेत. वाघांकडून असे स्टंट करुन घेणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. आधी व्हिडीओ पाहा.

 

एका युजरने लिहलं आहे की, अशा प्रकारचा मूर्खपणा ताबडतोब थांबला पाहिजे. त्याचवेळी दुसर्‍याने इन्स्टाग्राम काऊंटच्या अॅडमिनला प्रश्न विचारला आहे की, तुम्ही तुमच्या अकाऊंटवरुन असल्या फालतू गोष्टी काय प्रमोट करता? त्याच वेळी, अजून एकाने लिहिले आहे, यात गर्व करण्यासारखे काही नाही, ते पाळीव प्राणी नाही तर भयानक प्राणी आहे. अनेक वापरकर्ते सार्वजनिक ठिकाणी वन्य प्राणी आणणे कायदेशीर आहे का असा प्रश्न विचारत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी दुबई पोलिसांनी इशारा दिला होता की कोणत्याही वन्य प्राण्याला सार्वजनिक ठिकाणी नेणे हा अमिरातीच्या कायद्यांतर्गत गुन्हा मानला जाईल. त्यानंतर दुबई पोलिसांनी असेही म्हटले होते की, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण काही लोक अजूनही सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी असे डावपेच अवलंबत आहेत.

हेही पाहा:

Video: ना कुठला मेकअप, ना भारी ड्रेस, एका स्मितहास्याने तिने नेटकऱ्यांची मनं जिंकली, पाहा पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ

Video: सर्फिंग करण्यासाठी समुद्रात गेला, आणि शार्कने त्याला वेढलं, व्हिडीओ पाहुन नेटकरी हादरले!

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष