Video: ना कुठला मेकअप, ना भारी ड्रेस, एका स्मितहास्याने तिने नेटकऱ्यांची मनं जिंकली, पाहा पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ

सध्या अमीनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यात अमीना रियाज एका मोठ्या चाकूने टरबूज कापताना दिसत आहे. या दरम्यानच कोणीतरी हा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

Video: ना कुठला मेकअप, ना भारी ड्रेस, एका स्मितहास्याने तिने नेटकऱ्यांची मनं जिंकली, पाहा पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ
सध्या अमीनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यात अमीना रियाज एका मोठ्या चाकूने टरबूज कापताना दिसत आहे.

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या पाकिस्तानची तरुणी दिसत आहे. अमीना रियाज असं या तरुणीचं नाव. ती कोणत्याही मेकअप आणि स्टाईलशिवाय खूप सुंदर दिसते. इंटरनेटवर अमिनाचे व्हिडिओ गेल्या काही काळात चर्चेचे विषय ठरले आहेत. जो कोणी या मुलीला पाहत आहे तो तिची स्तुती केल्याशिवाय राहात नाही ( Pakistani roti making girl slices watermelon video goes viral netizens loved its)

सध्या अमीनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यात अमीना रियाज एका मोठ्या चाकूने टरबूज कापताना दिसत आहे. या दरम्यानच कोणीतरी हा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तेव्हापासून अमीना रियाझ इंटरनेट जगतात प्रचंड व्हायरल झाली. तेव्हापासून अमिनाचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहेत.

व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by @ekiya5

अमिनाच्या आधीच्या व्हिडीओमध्ये ती लोकांना आवडली होती, आधीच्या व्हिडीओत ती भाजी कापत होती. यावेळी सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आताचा हा व्हिडिओ ekiya5 ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. मुलीचे सौंदर्य पाहून लोक तिचं कौतुक करत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे सौंदर्य कुणाचंही मन जिंकेल. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, मी इतकी सुंदर मुलगी पहिल्यांदा पाहिली आहे. कुणी या मुलीच्या एक्स्प्रेशनवर फिदा आहे तर कुणी नैसर्गिक सौंदर्यावर, म्हणूनच अमिना इंटरनेट सेंसेशन झाली आहे.

हेही पाहा:

Video: सर्फिंग करण्यासाठी समुद्रात गेला, आणि शार्कने त्याला वेढलं, व्हिडीओ पाहुन नेटकरी हादरले!

Video: यूपीत वाहतूक पोलिसांची दबंगगिरी, तरुणाला जखमी करणाऱ्या पोलिसाला नागरिकांकडून चोप, व्हिडीओ व्हायरल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI