AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लंच ब्रेकमध्ये महिला चहा प्यायला गेली, होऊन आली 16 कोटींची मालकीण, पण ऑफिसमध्ये येताच…

ऑफिसमध्ये अनेकदा तणावपूर्ण वातावरण असतं... अशात काही कर्मचारी ऑफिस बाहेर जातात. पण एक महिला लंच ब्रेकमध्ये चहा प्यायला गेली आणि त्यानंतर 16 कोटींची मालकीण होऊनच आली... पण ऑफिसमध्ये पुन्ही जाताच काय झालं जाणून घ्या

लंच ब्रेकमध्ये महिला चहा प्यायला गेली, होऊन आली 16 कोटींची मालकीण, पण ऑफिसमध्ये येताच...
| Updated on: Sep 26, 2026 | 11:33 AM
Share

एक महिला ऑफिसमध्ये असताना चहा प्यायला गेली आणि तब्बल 16 कोटींची मालकीण होऊन आली… पण कसं? असा प्रश्न तुम्हाला देखील बसला असेल.. तर त्या महिलेसोबत काय झालं जाणून घ्या. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या या महिलेचा तो दिवस इतर दिवसांसारखाच सामान्यपणे सुरू झाला होता. पण, त्या दिवशी ती काहीशी तणावात होती आणि कामाच्या वेळेत दुपारचे जेवण घेण्यासाठी बाहेर पडली होती. कदाचित तिलाही अंदाज नव्हता की हा छोटासा ब्रेक तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. महिला जेवण्यासाठी ‘लव फूड मार्ट’ नावाच्या दुकानात पोहोचली. तिथे तिने 20 डॉलर्सचे ‘प्लॅटिनम 7s’ स्क्रॅच-ऑफ तिकीट विकत घेतलं. तिकीट खरेदी करणं तिच्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट नव्हती. तिने फक्त नशीब आजमावण्यासाठी कार्ड घेतलं आणि दुकानामध्येच ते स्क्रॅच करण्यास सुरुवात केली.

‘पीपल मॅगझीन’नुसार, महिला जशीजशी तिकीट स्क्रॅच करत गेली, तशी तिला जाणीव होऊ लागली की काहीतरी मोठं घडलं आहे. शेवटी तिला समजलं की, तिकिटवर सर्वात मोठा जॅकपॉट लागला आहे. म्हणजेच तिने 2 दशलक्ष डॉलर्सची लॉटरी जिंकली होती. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 17 कोटी रुपये होते. इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर कोणत्याही माणसाच्या आनंदाला पारावार उरणार नाही. कोणी कुटुंबाला फोन करेल, कोणी मित्रांना सांगेल आणि कोणी कदाचित त्याच क्षणी नोकरीचा राजीनामा देण्याचा विचार करेल. पण या महिलेने असं काहीही केलं नाही. ती पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि राहिलेलं काम करु लागली.

या प्रकरणात लक्ष वेधणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तुमच्याकडे असं तिकीट असेल ज्याची किंमत कोटी रुपयांची आहे आणि तुम्हाला माहीत असेल की तुमचं आयुष्य काहीच वेळात पूर्णपणे बदलणार आहे. असं असतानाही तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये परत जाऊन काम करावं लागेल… महिलेने तेच केले. तिने तिकीट स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आणि आपली शिफ्ट पूर्ण केली. तिने ना ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ घातला आणि ना लगेच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

महिलेसमोर होते दोन पर्याय…

जॅकपॉट जिंकल्यानंतर त्या महिलेकडे रक्कम घेण्यासाठी दोन पर्याय होते. पहिला पर्याय असा होता की तिला संपूर्ण 2 कोटी डॉलर्सची रक्कम 30 वर्षांमध्ये वार्षिक हप्त्यांच्या स्वरूपात मिळाली असती. दुसरा पर्याय असा होता की ती संपूर्ण रकमेची एकरकमी कॅश पेमेंट घेऊ शकली असती. अशात महिलेने दुसरा पर्याय निवडला. टॅक्स कापण्यापूर्वी तिला 9,52,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच कागदावर जिंकलेली रक्कम 2 दशलक्ष डॉलर्सची होती, पण कॅशचा पर्याय निवडल्यामुळे तिच्या हातात टॅक्स कापण्यापूर्वी 9,52,000 डॉलर्स आले. पण महिलेने तिची ओळख लपवली आहे. त्यामुळे ती कोणत्या ऑफिसमध्ये काम करते आणि कुठे राहते याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप