स्टेटसवर असे फोटो टाकायची पत्नी, पतीला करायची हाईड, दीराने बिंग फोडले…

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हणजे एकमेकांवर विश्वास असायला हवा. वर आणि वधू यांच्या मिलनाचा हा सोहळा काही वेळा काही संशयाने काळंवडला जात असल्याच्या घटना आजूबाजूला घडत आहेत.

स्टेटसवर असे फोटो टाकायची पत्नी, पतीला करायची हाईड, दीराने बिंग फोडले...
Updated on: Nov 27, 2025 | 8:15 PM

भारतात सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. यंदा लाखोच्या संख्येत विवाह होण्याचा अंदाज आहे. या दरम्यान सोशल मीडियावर वेडिंगशी रिलेटेड अनेक व्हिडीओ शेअर होत आहेत. या व्हिडीओत वराची मस्करी करण्याचे व्हिडीओ आहेत. तर वराचे किंवा नणंदेने केलेल्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या दरम्यान एका लग्नात मोठा हंगामा झाला आहे. यासाठी निमित्त ठरले ते एका मुलीच्या प्रोफाईल फोटोचे…

लग्नाचा माहोल होता. रोषणाई आणि लाईट्स चमकत होत्या. बँड बाजा वाजत होता. आणि लग्नाचे विधी सुरु होते. वर हार घेऊन स्टेडवर उभा होता. वधूकडे प्रेमाच्या नजरेने पाहात होता. तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ म्हणजे दीर आला, त्याने वराच्या हातात काही फोटो दिले. हे फोटो पहाताच त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आणि त्याने तेथे वरमाला टाकून हंगामा केला. अखेर या फोटोत काय होते की वर एवढा भडकला ?

ऑनलाईन शेअर करायची फोटो

यंदाचा जमाना सोशल मीडियाचा आहे. मुलगी देखील स्वत: नव्या जमान्याची असल्याने स्वत:चे फोटो टाकायची. परंतू स्वत:चे फोटो टाकण्याच्या वेळी ती होणाऱ्या पती आणि सासरच्या मंडळींना हाईड करायची. त्यामुळे त्यांना हे फोटो दिसायचे नाहीत. परंतू ती चुकून दीराला हाईड करायचे विसरले. त्याने याचा स्क्रीनशॉट घेतला आणि वराला लग्नमंडपात गिफ्ट केला. हा फोटो पाहाताच वराचा पारा चढला. फोटोत मुलगी वेस्टर्न कपड्यात नजर आली.विशेष म्हणजे तिने ऑनलाईन लोकांना याची कॅप्शन सुचवण्यास सांगितले होते. प्रोफाईल फोटोत जी मुलगी होती, ती समोर पारंपारिक पोशाखात उभी होती. परंतू फोटोत तिने टाईट वेस्टर्न ड्रेस, स्लीव्हलेस टॉप, हाय हिल्स, लिपस्टीक – काजळ लावले होते.

लग्न झाले रद्द !

ही घटना कुठली आहे याची माहिती इंस्टाग्रामवर दिलेली नाही. परंतू व्हायरल पोस्टच्या नुसार हे फोटो पाहिल्यानंतर वराने लग्न रद्द केले. वधूने हे सर्व फोटो जुने असल्याचे सांगितले. परंतू एक स्टेटस तीन दिवसांपूर्वीचे निघाल्याने वराचा विश्वास उडाला.सासरच्या मंडळींनी देखील लग्नास नकार देत मुलाची बाजू घेतली. या हंगाम्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लोक निरनिराळ्या कमेंट्स करत आहेत. काही जणांनी वराला पाठींबा दिला आहे तर काहींनी यास चुकीचे म्हटले आहे. जर मुलीने वेस्टर्न कपडे घातले तर काय झाले ? लग्न रद्द करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट पाहा –