AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई आणि मुलीच्या रंगलेल्या स्पर्धेत चिमुकलीला काय मिळतं गिफ्ट? धमाल उडवणारा Video Viral

आई आणि मुलांचे विविध खेळ (Game) आणि त्याचे व्हिडिओ (Video) तर तुम्ही नक्कीच पाहिले असतील. आता असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा शॉर्ट (Short) व्हिडिओ आई आणि मुलगी यांच्यातल्या रंगलेल्या खेळावर आहे. हा मनोरंजक तर आहेच पण शिकवण देणाराही...

आई आणि मुलीच्या रंगलेल्या स्पर्धेत चिमुकलीला काय मिळतं गिफ्ट? धमाल उडवणारा Video Viral
आई-मुलीचा रंगलेला खेळ
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 03, 2022 | 2:53 PM
Share

Mother Daughter Video : सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. अनेक व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. काही व्हिडिओ हसवता हसवता डोळ्यांतून पाणी आणतात. काही व्हिडिओ विनोदी तर असतात. मात्र त्यातून एक धडा आपल्याला घ्यायचा असतो. एकादा संदेश त्यातून देण्याचा प्रयत्न असतो. लहान मुलांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर आवडीनं पाहतो. लहान मुलं निष्पाप आणि गोड असतात. त्यामुळे त्यांचे व्हिडिओही मग यूझर्स आवडीनं पाहतात आणि शेअरही करतात. आई आणि मुलांचे विविध खेळ (Game) आणि त्याचे व्हिडिओ (Video) तर तुम्ही नक्कीच पाहिले असतील. आता असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा शॉर्ट (Short) व्हिडिओ आई आणि मुलगी यांच्यातल्या रंगलेल्या खेळावर आहे. हा मनोरंजक तर आहेच पण शिकवण देणाराही…

निघतात कांदे आणि मिरच्या

आई आणि मुलगी एक खेळ खेळत असतात. यात दोघींनाही एक एक गिफ्ट मिळतं. दोघींनाही समोरून गिफ्ट दिल्यानंतर आई सर्वात आधी गिफ्ट उचलते पण स्वत:समोरचं नाही तर मुलीसमोरचं. मग मुलगी गंमतीत चिडते आणि म्हणते, त्या पॅकेटमधलं गिफ्ट नक्की चांगलं असेल यापेक्षा, मला माहीत आहे. मग आई पॅक उघडते. वरून चॉकलेटचा बॉक्स वाटतो. मग आई तो फोडून उघडते तर त्यात कांदे, मिरच्या निघतात.

यूट्यूबवर अपलोड

मुलगी आता तिचा बॉक्स ओपन करते तर तिच्या बॉक्समध्ये मात्र चॉकलेट्स असतात. असा हा व्हिडिओ सर्वांनाच आवडला आहे. आई शेवटी आईच असते, असं यूझर्स म्हणत आहेत. हा व्हिडिओ यूट्यूबवर हरप्रीत एसडीसी (Harpreet SDC) या चॅनेलवर ‘Guneet ko ab Kya Mila‘ या कॅप्शनसह अपलोड करण्यात आला आहे. 29 जानेवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 27,089,645 व्ह्यूज मिळाले आहेत. यूझर्स लाइक आणि कमेंट करून आपली पसंती दर्शवत आहेत. (Video Courtesy – Harpreet SDC)

आणखी वाचा 

…आणि पेट्रोलपंपावर ग्राहकाला ‘असा’ लावला चुना, तुमच्यासोबत तर असं घडत नाही ना? Funny Video Viral

Viral Video : या चिमुकलीचं Basketball कौशल्य पाहा; मग म्हणाल, उंचीनं नाही आत्मविश्वासानं जिंकता येतं मैदान

‘या’ चिरतरुणाचा दुचाकीवर धोकादायक स्टंट, 10 लाखांहून अधिक Likes मिळालेला हा Viral Video पाहा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली