AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि पेट्रोलपंपावर ग्राहकाला ‘असा’ लावला चुना, तुमच्यासोबत तर असं घडत नाही ना? Funny Video Viral

फास्ट लाइफस्टाइल(Lifestyle)मध्ये विनोदी व्हिडिओ आपल्याला टेन्शन फ्री करण्यासाठी उपयोगी पडतात. एक व्हिडिओ (Video) प्रचंड व्हायरल (Viral) होतोय. पेट्रोल पंपा(Petrol Pump)वरचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकवेळी पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्ही नक्की असा विचार कराल आणि हसाल.

...आणि पेट्रोलपंपावर ग्राहकाला 'असा' लावला चुना, तुमच्यासोबत तर असं घडत नाही ना? Funny Video Viral
पेट्रोल पंपावर ग्राहकाला लावला चुना
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 03, 2022 | 11:09 AM
Share

Petrol Pump comedy Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण पाहत असतो. कोणाला डान्सचे व्हिडिओ आवडतात, कर कोणाला माहितीपर व्हिडिओ. काही जणांना विनोदी व्हिडिओ जास्त आवडतात. असे व्हिडिओ व्हायरलही होतात. आपल्या फास्ट लाइफस्टाइल(Lifestyle)मध्ये असे व्हिडिओ आपल्याला टेन्शन फ्री करण्यासाठी उपयोगी पडतात. दिवसभरात आपण असे अनेक व्हिडिओ पाहत असतो. त्यातलाच एक व्हिडिओ (Video) प्रचंड व्हायरल (Viral) होतोय. पेट्रोल पंपा(Petrol Pump)वरचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल आणि विचारही कराल. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकवेळी पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्ही नक्की असा विचार कराल. मात्र सध्यातही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडलाय. विनोदाच्या हेतूने जरी हा व्हिडिओ केला असला तरी, यातून यूझर्स जो बोध घ्यायचाय तो घेणारच आहेत.

पेट्रोलपंप चालकाची चलाखी

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की पेट्रोल पंपावर रांग आहे. मग एक ग्राहक पेट्रोल भरण्यासाठी आपल्या दुचाकीची टाकी उघडतो. पंपावरच्या व्यक्तीला तो 40 रुपयांचं पेट्रोल टाकण्याची मागणी करतो. यावेळी पंपावरचा कर्मचारी त्याला मीटरकडे पाहून शून्य असल्याची खात्री करायला सांगतो. मग ग्राहकही म्हणतो, मी शून्यत पाहतोय. अशाप्रकारे ग्राहक मीटरकडे पाहतो तर कर्मचारी पेट्रोल भरण्याच्या नावाखाली ग्राहकाच्या उलट बाजूनं बाटलीत पेट्रोल भरून दुसरीकडून पळून जातो.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर grandmasti arpit या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 7,123,180 व्ह्यूज मिळाले असून अनेकजण व्हिडिओला लाइक आणि कमेंट करत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ आवडलाय. एका यूझरनं कमेंट केलीय, की हा व्हिडिओ इतका लोकांना आवडेल, असं वाटलं नव्हतं. अशा अनेक कमेंट तुम्ही वाचू शकता. (Video Courtesy – grandmasti arpit)

Viral Video : महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असते; अचानक म्हातारी व्यक्ती समोर येते, अन्…

Biker Stunt Video Viral : हुक्की आली म्हणून स्टंटबाजी केली अन् असाकाही आपटला, की…

तंत्रज्ञानाचा ‘असा’ही आविष्कार, लंडनमधली Wheelchair Lift पाहिली का? Video होतोय Viral

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ