Nagin Dance Viral Video : भौतिकशास्त्राचे सर्व नियम मोडणारा ‘असा’ नागीण डान्स पाहिला नसेल, हसून हसून लोटपोट व्हाल!

प्रदीप गरड

Updated on: Jan 31, 2022 | 1:20 PM

लग्नाच्या पार्टीत, मिरवणुकीत लोक अनेकदा नागीण डान्स (Nagin Dance) करताना दिसतात. बरेच लोक नाचण्यात इतके बेभान होतात, की त्यांनाही कळत नाही, ते काय करताहेत. सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती घोड्यावर बसून नागीण डान्स करत आहे. वर(groom)ही घोड्यावर स्वार आहे.

Nagin Dance Viral Video : भौतिकशास्त्राचे सर्व नियम मोडणारा 'असा' नागीण डान्स पाहिला नसेल, हसून हसून लोटपोट व्हाल!
नागीण डान्स करताना वराचा मित्र

Marriage viral Video : लग्नसराई आणि त्यातल्या भन्नाट गोष्टी आपलं चांगलंच मनोरंजन करत असतात. कारण लग्नातले व्हिडिओ व्हायरल होतात आणि आपण हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. लग्नात मित्रांचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे. एकप्रकारे मित्रांशिवाय होणारं लग्न (Wedding) नेहमीच अपूर्ण असतं. कारण हेच लोक लग्नात जमतात, पण कधी कधी गंमत म्हणून असं काही करतात आणि मग बघणारे थक्क होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही हसण्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. लग्नाच्या पार्टीत, मिरवणुकीत लोक अनेकदा नागीण डान्स (Nagin Dance) करताना दिसतात. बरेच लोक नाचण्यात इतके बेभान होतात, की त्यांनाही कळत नाही, ते काय करताहेत. सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती घोड्यावर बसून नागीण डान्स करत आहे. वर(groom)ही घोड्यावर स्वार आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, नाचत असताना एका व्यक्तीनं अचानक वराच्या घोड्यावर उडी मारली आणि नागीण डान्स करायला सुरुवात केली. आश्‍चर्याची बाब म्हणजे, त्या वेळी वरही घोड्यावर स्वार होता. या दरम्यान लोक वराच्या तोंडात नोटा देतात. त्यानंतर ती व्यक्ती ती बाहेर काढते आणि मग परत नाचायला लागते. हा मजेदार व्हिडिओ memes.bks नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. याला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत.

मजेशीर कमेंट्स

हा डान्स अत्यंत विनोदी असून याचा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. यामुळेच अनेक यूझर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘इसने तो आग लगा दी अपने डांस परफॉर्मेंस से…! आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, ‘अॅडमिनच्या लग्नात कोण डान्स करेल असा?’ दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, ‘इस नागिन डांस ने Physics के Law को भी गलत साबित कर दिया.’ याशिवाय इतर अनेक यूझर्स यावर मजेशीर कमेंट करत आहेत.

Cutest Band : एकापेक्षा एक… चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!

Viral Video : ‘कृपया लक्ष द्या’; एअर होस्टेस असलेली ‘ही’ नववधू काहीतरी सांगू इच्छिते, ऐका…

Viral Video : स्वत:च्याच लग्नात वधूच्या डुलक्या, बँक्वेट हॉलमध्ये पिकला हशा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI