कोंबडी आधी की अंडं? जगाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं

आधी अंडं की कोंबडी? हा प्रश्न तुम्ही अनेकदा ऐकला असाल. त्याचं उत्तरही तुम्हाला आजतागायत मिळालं नसेल. बरं हा प्रश्न जगात प्रत्येकाला कधी ना कधी पडलेला आहे. संशोधकांनाही या प्रश्नाने अनेकदा घेरलं होतं. अखेर त्यांना याचं उत्तर मिळवणंही शक्य झालं आहे.

| Updated on: May 24, 2025 | 4:32 PM
1 / 6
पृथ्वीवर आधी काय आलं? कोंबडी की अंडं? माणसाला वर्षानुवर्ष पडलेला हा प्रश्न आहे. एखाद्याला वादावादीत निरुत्तर करायचे असेल तर हा प्रश्न हमखास विचारला जातो. बरं जो विचारतो, त्यालाही या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते. पण आता शास्त्रज्ञांनीच या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे.

2 / 6
जगभरातील सर्व अंडी एकत्र करून पाहिलं तर कोंबडी पूर्वी अंडं आल्याचं दिसून येतं. अंडे एक अब्ज वर्षापेक्षाही अधिक काळापासून विकसित झालं आहे. तर कोंबड्या 10 हजार वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.

3 / 6
रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सचे जीवाश्म वैज्ञानिक कोएन स्टिन यांच्यानुसार, एमनियाटेक अंडे कशेरूक जीवांच्या विकासातील एक मोठं पाऊल होतं. या अंड्यांनी जीवांना पाण्यापासून दूर राहून सुकलेल्या जमिनीवर प्रजनन करण्याची सुविधा दिली. पूर्वी जनावरांना अंडे देण्यासाठी जलाशयांवर निर्भर राहावे लागत होते. पण एमनियाटिक अंड्यांनी त्यांना यापासून मुक्तता दिली.

4 / 6
नेचर इकोलॉजी अँड इव्हॅल्यूएशन नावाच्या जर्नलमध्ये एक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला आहे. यात वैज्ञानिकांच्या टीमने 51 प्राचीन जीवांचे जीवाश्म आणि 29 आजही जिवंत असणाऱ्या प्रजातींची निवड केली. या जीवांची दोन समूहात विभागणी करण्यात आली. पहिला गट ओव्हिपरेस होता. कठोर वा नरम खोल अंडे देणारा हा जीव असतो. दुसरा जीव व्हिव्हिपेरस होता. जो जीवित पिल्लाला जन्म देतो.

5 / 6
कोंबड्यांचे पूर्वज हे जीवित पिल्लांना जन्म देणारे व्हिव्हिपेरस होते, असं अभ्यासातून दिसून आलं. म्हणजे या कोंबड्यांचे पूर्वज अंडी घालणारे नव्हते. पिल्लांना जन्म द्यायचे. या शोधातून कोंबड्यांचा विकास आणि त्यांची अंडी देण्याची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होते.

6 / 6
संशोधकानुसार, पृथ्वीवर आधी अंडं आलं. पण कोंबडीचं अंडं नव्हे. कोंबडीच्या अंड्याच्या निर्मितीत एक खास प्रोटीन OC-17 ची आवश्यकता असते. ते फक्त कोंबड्यांच्या अंडाशयातच बनते. त्यामुळे आधी कोंबडी आली आणि नंतर कोंबडीचे अंडे आले, असं वैज्ञानिक म्हणतात.