पिझ्झा डिलिव्हर करायला गेल्यावर चिंपांझीने दरवाजा उघडला! डिलिव्हरी बॉय घाबरला

खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

पिझ्झा डिलिव्हर करायला गेल्यावर चिंपांझीने दरवाजा उघडला! डिलिव्हरी बॉय घाबरला
chimpanzee paying for pizza
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 07, 2022 | 11:07 AM

ऑनलाइन डिलिव्हरी फूडची अनेक व्हिडीओज व्हायरल होत असतात. कधी डिलिव्हरी बॉय तर कधी ग्राहक अनेक मजेशीर गोष्टींमुळे व्हायरल होत असतात. दरम्यान, पिझ्झा डिलिव्हरीचा एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला की त्याला धक्काच बसतो. जेव्हा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन घराच्या दाराजवळ पोहचतो तेव्हा दरवाज्यातून माणूस बाहेर न येता चिंपांझी बाहेर येतो.

खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ रशियातील एका शहरातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

या व्हिडिओमध्ये एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या घरी जाऊन पिझ्झा डिलिव्हरी करताना आणि दारावरची बेल वाजवताना दिसत आहे.

पण दार उघडल्यावर डिलिव्हरी बॉयला धक्का बसतो. एक चिंपांझी आतून पैसे घेऊन बाहेर येतो. चिंपांझी बाहेर येताच डिलिव्हरी बॉयला ते पाहून धक्का बसतो आणि भीतीपोटी तो मागे हटतो.

पण चिंपांझी शांत उभा आहे आणि त्याच्या हातात पैसे आहेत. यानंतर डिलिव्हरी बॉय त्याला पिझ्झा देतो आणि पैसे घेतो आणि मग परत येतो.

चिंपांझींचा हा व्हिडिओ पाहून युझर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. इतकंच नाही तर या काळात चिंपांझीने चांगले कपडे घातले होते.

हे कपडे दिसायला हुबेहूब मानवी कपड्यांसारखे दिसत होते. चिंपांझी खूप हुशार असतात आणि ते घरातील कामांमध्ये लोकांना मदत करू शकतात, असंही एका युझरने लिहिलं आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.