VIDEO : … आणि ट्रेनसमोर अचानक भयावह हत्ती उभा राहीला.. मग पुढे काय झालं ते बघाच…

आम्ही तुम्हाला आज एक वेगळा व्हिडीओ दाखवणार आहोत. या व्हिडीओत एक मोठा हत्ती थेट ट्रेन समोर उभा राहतो आणि ट्रेन चालकाला जणू काही आव्हानच देतो (Elephant came on in front of train viral video).

VIDEO : ... आणि ट्रेनसमोर अचानक भयावह हत्ती उभा राहीला.. मग पुढे काय झालं ते बघाच...

मुंबई : सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल, याचा काहीच भरोसा नाही. व्हिडीओत काहीतरी वेगळं किंवा भन्नाट असलं की तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. बऱ्याचदा लोकांना व्हिडीओ आवडतात. व्हिडीओ बघितल्यानंतर लोकांना हसायलाही येतं. तर काही व्हिडीओ बघितल्यावर लोकांच्या मनाला चटका देखील लागतो. दरम्यान, सध्या आम्ही तुम्हाला आज एक वेगळा व्हिडीओ दाखवणार आहोत. या व्हिडीओत एक मोठा हत्ती थेट ट्रेन समोर उभा राहतो आणि ट्रेन चालकाला जणू काही आव्हानच देतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना आवडतोय (Elephant came on in front of train viral video).

नेमकं काय आहे व्हिडीओत?

व्हिडीओत एक रेल्वेरुळ दिसतोय. खरंतर हा व्हिडीओ एका रेल्वेच्या इंजिनमधून शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत रेल्वेरुळ दिसतोय. इंजिनच्या काचेबाहेरुन एक मोठा हत्ती इंजिन जवळ येताना दिसतोय. तो इंजिनजवळ येताना दिसतो. यावेळी मोटरमॅन हॉर्न वाजवतो. त्यानंतर हत्ती स्वत:हून मागे सरकरतो. त्यानंतर मोटरमॅन सूटकेचा श्वास घेतो. दरम्यान, हत्ती जेव्हा ट्रेन जवळ येतो तेव्हा त्याचे हावभाव अत्यंत रोचक दिसतात.

संबंधित व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. “ट्रेनला बघून हत्ती म्हणतो, माझ्यापेक्षा कोण मोठा होऊ शकतो?”, असं कॅप्शन सुशांत नंदा यांनी दिलंय (Elephant came on in front of train viral video).

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आतापर्यंत जवळपास सात हजार पेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. तर एक हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाईक केलाय. काही लोक हत्तीचं कौतुक करत आहेत. तर काहीचं म्हणणं आहे, ट्रेनने आतापर्यंत अनेक जनावरांना चिरडलंय, त्यातल्या त्यात हे बरंय. आता तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.

हेही वाचा : या आईला सलाम! पोटचं लेकरु पोटाशी बांधून रिक्षाचालकाचं काम, छत्तीसगडच्या रणरागिणीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

Published On - 4:32 pm, Tue, 9 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI