या आईला सलाम! पोटचं लेकरु पोटाशी बांधून रिक्षाचालकाचं काम, छत्तीसगडच्या रणरागिणीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

एका प्रेरणादायी आईची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही आई दिवसभर रिक्षा चालवते (Woman auto driver drives by tying baby on stomach in ambikapur chhattisgarh).

या आईला सलाम! पोटचं लेकरु पोटाशी बांधून रिक्षाचालकाचं काम, छत्तीसगडच्या रणरागिणीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 4:00 PM

रायपूर : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं म्हणतात ते उगाच नाही. आई आपल्याला घडवते, लढायला आणि जिंकायला शिकवते. वेळप्रसंगी आपल्या मदतीसाठी धावून येते. आपल्या कुटुंबासाठी प्रचंड राबते. कारण ती शेवटी आई असते. अशाच एका प्रेरणादायी आईची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही आई दिवसभर रिक्षा चालवते. तिला एक लहान बाळ आहे. त्या बाळाला पोटाशी बांधून ती दिवसभर काम करते. या आईची माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचते ते सर्व या आईचं प्रचंड कौतुक करतात. या आईचं नाव तारा प्रजापती असं आहे. ती छत्तीसगडच्या अंबिकापूर शहरात रिक्षा चालवून आपला आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह करते (Woman auto driver drives by tying baby on stomach in ambikapur chhattisgarh).

ताराच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष

ताराच्या संघर्षाबाबत सांगायचं झाल्यास, ताराचं दहा वर्षांपूर्वी लग्न झालं. तिचं जेव्हा लग्न झालं त्यावेळी तिच्या सासरची परिस्थिती बेताची होती. ताराचं शिक्षणही फक्त बारावी पर्यंत झालंय. गरिबीपासून सुटका मिळवायची असेल तर आपणही पतीच्या खांद्याला खांदा लाऊन काम करायला हवं, असा विचार ताराच्या मनात आला. हाच विचार तिने प्रत्यक्षात साकारही करुन दाखवला. तारा सध्या छत्तीसगडच्या रस्त्यांवर रिक्षा चालवताना दिसते (Woman auto driver drives by tying baby on stomach in ambikapur chhattisgarh).

मुलाकडे लक्ष देणारं कुणी नाही

ताराची घरची परिस्थिती फार बेताची आहे. तिला एक लहान मुल आहे. मात्र, त्याच्याकडे लक्ष देणारं कुणी नाही. याशिवाय घराची परिस्थिती बेताची असल्याने संघर्षाशिवाय पर्याय नाही, हे ताराला ठावूक आहे. त्यामुळे तारा आपल्या लहान बाळाला पोटाशी बांधून रिक्षा चालकाचं काम करतेय. तिच्या या कर्तृत्वामुळे अनेकांना प्रेरणा मिळतेय. अनेकजण तिचं खुल्या मनाने कौतुकही करतात.

ताराची प्रतिक्रिया

दरम्यान, आम्ही ताराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आपल्या संघर्षाबाबत माहिती दिली. “पोटापाण्यासाठी रिक्षा चालवणं देखील गरजेचं आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. मुलांचं शिक्षण आणि घर चागलं चालावं यासाठी ऑटो रिक्षा चालवते. पतीसोबत मी देखील कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे. रिक्षा चालकाचं काम अजिबात सोपं नाही. मात्र, तरीही मला हे काम करावं लागतं. काम करताना मी माझ्या लहान मुलाची देखील काळजी घेते. त्यासाठी मी खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि पाण्याची बॉटल जवळ ठेवते”, अशी प्रतिक्रिया ताराने दिली.

हेही वाचा : ‘फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं; सचिन वाझे पदावर राहिले तर अनेकांना बेड्या पडतील’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.