AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या मालिकेची भारतात प्रचंड क्रेझ, ‘मेरी जिंदगी है तू’चा 32 व्या भागाबाबत मोठी अपडेट समोर

पाकिस्तानी मालिका 'मेरी जिंदगी है तू' ची पाकिस्तान पेक्षा भारतात प्रचंड क्रेझ असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता या मालिकेच्या 32 व्या भागाची चाहत्यांना प्रचंड उस्तुकता आहे. कुठे पाहू शकता हा भाग?

पाकिस्तानच्या मालिकेची भारतात प्रचंड क्रेझ, 'मेरी जिंदगी है तू'चा 32 व्या भागाबाबत मोठी अपडेट समोर
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 02, 2026 | 11:42 AM
Share

Meri Zindagi Hai Tu Episode 32 : पाकिस्तानी रोमँटिक ड्रामा ‘मेरी ज़िंदगी है तू’ ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. हानिया आमिर आणि बिलाल अब्बास खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा एपिसोड 32 प्रदर्शित होणार होता; मात्र तो प्रसारित न झाल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे.

मालिकेची कथा आता अंतिम टप्प्याकडे पोहोचली आहे. आयरा आणि कामयार यांच्या आयुष्यात नवे वळण येत असून पुढील भागांमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे संकेत निर्मात्यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये ही मालिका ट्रेंड होत असून मुख्य कलाकारांमधील जबरदस्त केमिस्ट्री आणि भावनिक कथानक हेच तिच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण मानले जाते.

एपिसोड 32 का प्रदर्शित झाला नाही?

रिपोर्ट्सनुसार, एपिसोड 32 हा पाकिस्तानमध्ये ARY Digital च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार होता. नेहमीप्रमाणे हा भाग भारतात रात्री सुमारे 11:30 वाजेपर्यंत (IST) ऑनलाइन उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. मात्र चाहत्यांनी उशिरापर्यंत वाट पाहूनही नवीन भाग प्रसारित झाला नाही.

माहितीनुसार, रमजान महिन्यामुळे मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही मालिका आठवड्यातून एकदाच प्रत्येक शनिवारी प्रसारित होते. पाकिस्तानमध्ये याची नवीन वेळ रात्री 10:30 अशी निश्चित करण्यात आली आहे.

भारतात एपिसोड 32 कधी येणार?

नवीन भाग दाखवण्याऐवजी पाकिस्तानमध्ये एपिसोड 31 पुन्हा प्रसारित करण्यात आल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे चाहते नाराज झाले आहेत. आधीच आठवड्यातून एकच भाग पाहण्याची सवय लावून घेतलेल्या प्रेक्षकांना नवीन भाग न मिळाल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

एपिसोड 32 भारतात 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होईल अशी अपेक्षा होती. मात्र ताज्या माहितीनुसार, हा भाग या आठवड्यातही प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांना पुढील शनिवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आगामी भाग कथेला थेट फिनालेकडे नेणारा ठरणार आहे. यात कामयार आयराला माफ करणार का याचा उलगडा होणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...