फ्लाईटमध्ये पाण्याचा ग्लास लपवून का आणतात एअर होस्टेस ? कारण मोठे चमत्कारीक
तुम्ही विमान प्रवासात अनेक रंजक गोष्टीबद्दल ऐकले किंवा पाहिले देखील असेल. विमानातील एअर होस्टेस अनेकदा पाण्याचे ग्लास प्रवाशांकडे नेताना लपवून नेत असतात दिसतात. एका अनुभवी एअरहोस्टेसने यामागील खरे कारण तिच्या युट्युब चॅनलवर पोस्ट केले आहे.

विमानाने जलद गतीने प्रवास करता येतो. तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल त अनेकदा काही गोष्टींकडे तुमचे लक्ष वेधले असेल. अनेकदा एअर होस्टेस एखाद्या प्रवाशाने पाणी मागितल्यास त्याला पाण्याचा ग्लास देताना तो लपवून नेत असताना दिसतात. पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट विचित्र वाटू शकते. मात्र, एअर होस्टेस पाण्याचा ग्लास इतर प्रवाशांपासून लपवण्यामागे एक रंजक कारण आहे. १४ वर्षांपासून फ्लाईट अटेंडेंट म्हणून काम करणाऱ्या बार्बरा बॅसिलिएरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अर्जेंटीना येथे जन्मलेली बार्बरा ज्यांना सोशल मीडियावर बार्बी बॅक नावाने ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या टिकटॉक आणि युट्युब चॅनलवर विमान प्रवासातील काही रंजक सिक्रेट शेअर केले आहेत. त्यांच्या मते जेव्हा एखादा प्रवासी पाणी मागतो तेव्हा केबिन क्रुचा अनेक प्रयत्न असतो की कोणा अन्य प्रवाशाचे लक्ष त्या पाण्याच्या ग्लासकडे पडू नये.
फ्लाईट अटेंडेंटने सांगितले कारण ?
बार्बरा याच्या मते याचे कारण मोठे रंजक आहे. त्यांनी मजेत म्हटले की पाणी देखील संक्रमित होऊ ( Water is contagious ) शकते. बार्बरा यांच्या मते जेव्हा दुसऱ्या प्रवाशांची नजर हातातील पाण्याच्या ग्लासवर पडते, तेव्हा ते लोकही लगेच पाणी मागू लागतात. त्यानंतर एकामागोमाग पाणी मागणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत जाते.
बार्बरा यांनी सांगितले की खास करुन जेव्हा लांबचे उड्डाण असते आणि तेव्हा संपूर्ण फूड आणि बिव्हरेज सर्व्हीसचा क्रम याने प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे फ्लाईट अटेंडेंट आपल्या अनुभवाच्या आधारे पाण्याचा ग्लास थोडा लपवूनच त्या प्रवाशाच्या आसनापर्यंत नेणे प्रशस्त समजतात.
बार्बरा यांनी स्पष्ट केले की हा कोणा एअरलाईनचा अधिकृत नियम वा लिखित धोरण नाही. हे केवळ एक व्यावहारिक पद्धत असून केबिन क्रु आपल्या अनुभवाने हे शिकतात. सर्व प्रवाशांना भोजन आणि पेय वेळेत पोहचवण्यासाठी काही गोष्टी अनुभवातून शिकता येतात.
एअर होस्टेसचे सिक्रेट!
बार्बरा यांनी प्रवाशांना एक सल्ला देखील दिला आहे. त्यांच्या मते जर फ्लाईटमध्ये मोफत पाणी उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला हवे आहे तर वारंवार कॉल बटण दाबण्याच्या ऐवजी संधी मिळाल्यास शांततेने गॅलीत जाऊन केबिन क्रुकडून पाणी मागू शकता. यामुळे क्रुवर अतिरिक्त दबाव येत नाही आणि सर्व्हीस देखील सुरळीत चालू रहाते.
बार्बरा यांनी बजेट एअरलाईन रयानएअर (Ryanair) मध्ये आसन निवडण्याच्या बाबतीत टिप्स देखील दिल्या आहेत. विमानातील अखेरच्या रांगातील सीट शक्यतो निवडू नका. तेथे शौचालय आणि गॅलीच्या आसपास सतत लोकांचा आवाज, येजा, बडबड आणि अनेकदा टॉयलेटचा दुर्गंधी देखील येऊ शकते. तसेच विमानाच्या पाठच्या सीट जास्त मागे झुकत नसल्याने लांबच्या प्रवासात असहजता निर्माण होऊ शकते.