VIDEO : पतीची स्विमिंग पूलमध्ये परस्त्रीसोबत मजामस्ती? पत्नी खवळली आणि….

पती-पत्नीच्या नात्यात जितका विश्वास घट्ट असतो तितकं ते नात दृढ असतं (wife and husband viral video).

VIDEO : पतीची स्विमिंग पूलमध्ये परस्त्रीसोबत मजामस्ती? पत्नी खवळली आणि....
पतीची स्विमिंग पूलमध्ये परस्त्रीसोबत मजामस्ती? पत्नी खवळली आणि....

मुंबई : पती-पत्नीच्या नात्यात जितका विश्वास घट्ट असतो तितकं ते नात दृढ असतं. काहीवेळा काही प्रसंग असे घडू शकतात ज्यामुळे पती किंवा पत्नी दोघांना एकमेकांच्या चारित्र्यावर संशय येईल. याच संशयातून पती-पत्नीमध्ये वाद होतात. काही ठिकाणी तर संशयातून हत्येच्या घटना देखील घडल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला आज पती-पत्नीच्या संशया संबंधित एका विनोदी घटनेची माहिती सांगणार आहोत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय (wife and husband viral video).

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सुरुवातीला एक महिला खुर्चीवरुन उठते आणि ती स्विमिंग पूलच्या दिशेला धावत जाते. यावेळी स्विमिंग पूलमध्ये अनेकजण खेळत असतात. तिथेच तिचा पतीदेखील एका व्यक्तीसोबत स्विमिंग पूलमध्ये एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असतात. हे पाहून महिलेला धक्का बसतो. पतीसोबत उभी असलेली व्यक्ती कुणीतरी महिला आहे, असा तिचा अंदाज असतो. त्यामुळेच ती धावत त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न करते (wife and husband viral video).

मात्र, जेव्हा ती दोघांना धक्का देते तेव्हा विचित्र प्रकार निदर्शनास येतो. महिलेच्या पतीसोबत असणारी व्यक्ती महिला नसते तर तो पुरुष असतो. त्याने महिलांसारखे केस वाढवलेले असतात. त्यामुळे महिलेला ती व्यक्ती स्त्री वाटते. मात्र, सत्य भलतंच काहीतरी वेगळं निघतं. त्यानंतर ती महिला आपल्या पतीच्या खांद्यावर हात ठेवते.

आधी व्हिडीओ बघा :

हजारो युजर्सकडून लाईकचा पाऊस

संबंधित व्हिडीओ हा इन्स्टाग्रामवर urprizhikayeler या नावाच्या अकाउंटमधून शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ आवडत देखील आहे. त्यामुळे 92 हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केला आहे. तसेच जवळपास एक लाख लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

हेही वाचा : VIDEO : भर रस्त्यावर कार पलटली, खमक्या मुंबईकरांची साथ, मदतीला धावून गेले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI