AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : भर रस्त्यावर कार पलटली, खमक्या मुंबईकरांची साथ, मदतीला धावून गेले

मुंबईवर कितीही मोठं संकट आलं तरीही मुंबईकर खचून जात नाहीत. ते उलट धीराने त्या संकटाला सामोरं जातात (Mumbaikars help to car overturn back on its own wheels video goes viral).

VIDEO : भर रस्त्यावर कार पलटली, खमक्या मुंबईकरांची साथ, मदतीला धावून गेले
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 4:05 PM
Share

मुंबई : मुंबईवर कितीही मोठं संकट आलं तरीही मुंबईकर खचून जात नाहीत. ते उलट धीराने त्या संकटाला सामोरं जातात. याशिवाय मुंबईत कुणी संकटात सापडलं तर त्याच्या मदतीलाही ते आधी धावून जातात. मुंबईकर प्रचंड संघर्ष करतात, परिस्थितीला दोन हात करतात आणि जिंकतात देखील. त्यामुळे मुंबईचं स्पिरिट हे सर्वश्रूत असंच आहे. याच स्पिरिटच्या जोरावर मुंबईकर मोठमोठ्या संकटांना तोंड देतात. त्याचबरोबर इतरांनादेखील संकटातून बाहेर काढतात. सोशल मीडियावर मुंबईकरांच्या याच स्वभावाचं दर्शन घडवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय (Mumbaikars help to car overturn back on its own wheels video goes viral).

सोशल मीडिवर नेमका कोणता व्हिडीओ व्हायरल होतोय?

सोशल मीडिावर एका कार अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत कार अपघातामुळे पलटली आहे. संबंधित घटना ही मुंबईच्या वाळकेश्वर परिसरात घडली आहे. या व्हिडीओत काही मुंबईकर एकत्र येऊन त्या कारला पुन्हा तिच्या चाकांवर उभं करतात. यावेळी पोलीस देखील तिथे आहेत. पण फक्त पोलिसांकडून गाडी चाकांवर उभी राहू शकत नाही. हे तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना कळतं. त्यामुळे ते पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावतात. ते सर्व एकत्र येऊन कारला तिच्या पायांवर उभं करतात (Mumbaikars help to car overturn back on its own wheels video goes viral).

विशेष म्हणजे कार ही एका वर्दळीच्या रस्त्यावर पलटी झालेली असते. तिच्या आजूबाजूने वाहनांची वर्दळ असते. पण पोलीस आणि मदत करणारी माणसं काही काळ त्या वाहनांना दोन्ही बाजूने रोखतात आणि कारला सरळ चाकांवर उभं करतात. गाडी चाकांवर उभी केल्यानंतर तिचं झालेलं नुकसान स्पष्टपणे दिसतं. पोलीस गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडतात. तिथे आतमध्ये किती नुकसान झालंय त्याचा तपास करतात. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

युजर्सकडून मुंबईकरांचं कौतुक

संबंधित व्हिडीओ Binjal Parekh नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच व्हिडीओला फोटोग्राफर आणि कंटेट क्रिएटर Manav Manglani याने देखील 17 जूनला आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकजण मुंबईकरांचं कौतुक करत आहेत. तसेच मुंबईकर नेहमी मदतीला धावून जातात, अशा प्रतिक्रिया काही युजर्सकडून देण्यात आल्या आहेत.

व्हिडीओ बघा : 

हेही वाचा : Video | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.