Video | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ

वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करते. सध्या तिने डान्सचे काही व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केले आहेत. हे व्हिडीओ पाहून तिचे चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

Video | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ
RAJESHWARI KHARAT
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 18, 2021 | 12:14 AM

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काही मोजक्याच नट्या आहेत, ज्या तरुणांच्या मनावर अजूनही राज्य करतात. शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हीसुद्धा लोकांच्या ‘दिल की धडकन’ असलेल्या नट्यांपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर हॉट आणि क्यूट असे फोटो सतत अपलोड करत असते. तसेच वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करते. सध्या तिने डान्सचे काही व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केले आहेत. हे व्हिडीओ पाहून तिचे चाहते पुरते घायाळ झाले आहेत. (Marathi film actress Rajeshwari Kharat Shalu stunning dance video went viral on social media)

शॉर्ट ड्रेसमध्ये राजेश्वरीचा जलवा

सध्या चर्चेचा विषय़ ठऱणाऱ्या या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी म्हणजेच शालू खूपच क्यूट दिसत आहे. तिच्या सौंदर्याने तिचे चाहते पुरते घायळ झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी एका शॉर्ट ड्रसेमध्ये दिसते आहे. डोळ्यांवर येत असलेल्या बटा आणि त्यावर शालूचे मनमोहक हावभाव यामुळे व्हिडीओंमध्ये राजेश्वरीचे सौंदर्य चांगलेच खुलले आहे.

डान्समुळे चाहत्यांची धडधड वाढली

या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी पंजाबी आणि हिंदी गाण्यांवर डान्स करते आहे. या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसतेय. तिने मारलेले ठुमके तर तिच्या चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवत आहेत. ती हिंदी भाषेतील ‘आँखोमे बसे हो तूम’ या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न करते आहे. हावभाव कसे असावेत, ठेका कसा धरावा हे समजत नसल्यामुळे ती सुरुवातीला थोडी गोंधळलीसुद्धा आहे. मात्र नंतर पुन्हा एकदा राजेश्वरी मजेदार डान्स करताना दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

 

राजेश्वरीच्या चाहत्यांच्या शेकडोंनी कमेंट्स

राजेश्वरीने तिच्या फेसबूक अकाऊंटवर दोन व्हिडीओ अपलोड केले आहेत. या दोन्ही व्हिडीओंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर तिच्या शेकडो चाहत्यांनी तिच्या डान्सवर उत्स्फूर्तपणे कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय ?

Video | नवा शेखचिल्ली ! एका क्षणात झाड तोडलं, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

नातवंडे पाहण्याची आईला हौस, लेस्बियन मुलीला दिले थेट शुक्राणूंचे इंजेक्शन

(Marathi film actress Rajeshwari Kharat Shalu stunning dance video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें