Video | डोक्यावर पदर, अंगावर केशरी साडी, महिलेच्या ठुमक्यांनी नेटकरी घायाळ

ही महिला आपला सुंदर डान्स आणि मनमोहक अदाकारीने सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे. या महिलेचे नाव रंजना सिंह असून तिचे इन्स्टाग्रामवर 1.5 लाख फॉलोअर्स आहेत.

Video | डोक्यावर पदर, अंगावर केशरी साडी, महिलेच्या ठुमक्यांनी नेटकरी घायाळ
viral women
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 16, 2021 | 10:24 PM

मुंबई : आपल्या देशात टॅलेन्टला कमी नाही. शोधच घ्यायचा म्हटलं तर प्रत्येक गावात अनोखी प्रतिभा असलेला एकतरी व्यक्ती आपल्याला नक्कीच सापडेल. वेगवेगळ्या कला असलेले हे लोक आजकाल सोशल मीडियावर त्यांच्या कलेचे प्रदर्शन करत आहेत. त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सध्या अशाच एका महिलेने नेटकऱ्यांना वेड लावले आहे. ही महिला आपला सुंदर डान्स आणि मनमोहक अदाकारीने सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे. या महिलेचे नाव रंजना सिंह असून तिचे इन्स्टाग्रामवर 1.5 लाख फॉलोअर्स आहेत. (people like women dance on on saree video trending on social media)

महिलेच्या डान्सचे नेटकरी दिवाने

रंजना सिंह या आपल्या युनिक डान्समुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्या डोक्यावर पदर घेऊन गाण्यावर जबरदस्त ठेका धरतात. गाण्याच्या चढउतारासोबत त्या आपल्या शरीराची हालचाल करतात. ही महिला हरियाणवी तसेच पंजाबी गाण्यांवर डान्स करते. या महिलेच्या डान्सचे व्हिडीओ फक्त काही मिनिट किंवा सेकंदाचे असले तरी घेतलेले ठुमके आणि हावभाव यामुळे ते व्हिडीओ हजारो नेटकरी पाहतात.

महिलेचे हावभाव नेटकऱ्यांना आवडले

या महिलेने साडी परिधान करुनच आपले बहुतांश व्हिडीओ अपलोड केले आहेत. अंगावर साडी नेसलेली असूनही महिलेने केलेला डान्स लोकांना चांगलाच आवडलेला आहे. तसेच या महिलेचे हावभावाही या व्हिडीओंमध्ये पाहण्यासारखे आहेत.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया

या महिलेला इन्स्टाग्रामवर 1.5 लाखपेक्षा अधिक लोक फॉलो करतात. तिचा प्रत्येक व्हिडीओ लोकांना आवडत असून नेटकरी त्यावर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

Video | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | पत्नी चहा द्यायला आली अन् भलतंच घडलं, पतीही चांगलाच संतापला, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ

(people like women dance on on saree video trending on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें