Video | पत्नी चहा द्यायला आली अन् भलतंच घडलं, पतीही चांगलाच संतापला, पाहा मजेदार व्हिडीओ

अशाच एका नवरा-बायकोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बायकोने अशा काही गोष्टी केल्या आहेत, ज्यामुळे नवरा चांगलाच भडकला आहे.

Video | पत्नी चहा द्यायला आली अन् भलतंच घडलं, पतीही चांगलाच संतापला, पाहा मजेदार व्हिडीओ
husband wife viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 16, 2021 | 8:26 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोण आणि काय करेल याचा काही नेम नाही. या मंचावर एकापेक्षा एक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ तर चांगलेच व्हायरल होतात. नवरा आणि बायकोच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर (social media) आवडीने पाहिले जाते. याच कारणामुळे एका नवरा-बायकोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बायकोने अशा काही गोष्टी केल्या आहेत, ज्यामुळे नवरा तिच्यावर चांगलाच भडकला आहे. (while giving tea wife fart in front of husband video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या घरात खुर्चीवर बसला आहे. तो मनातून आनंदीत असून त्याने आपल्या बायकोला चहा तयार करायला सांगितले आहे. थोड्या वेळाने या माणसाची बायको त्याच्यासाठी चहा घेऊन आल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय. यावेळी बायको आपल्या नवऱ्याला चहा देण्यासाठी समोर झाली आहे. मात्र, चहा घेताना या महिलेने पोट खराब असल्यामुळे पोटातील गॅस (हवा) सोडला आहे. हा प्रकार घडल्यानंतर व्हिडीओतील माणूस समंजसपणे वागताना दिसतोय. गॅस सोडणे ही साधारण बाब असून अशा प्रकारची अडचण सर्वांनाच येते, असे हा माणूस म्हणतोय.

शेवटी नवरा चांगलाच भडकला

नंतर व्हिडीओतील महिला पुन्हा दुसऱ्यांदा गॅस सोडतेय. यावेळीसुद्धा या महिलेचा नवरा तिला काहीही म्हणत नाहीये. मात्र, पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा या महिलेने पोटातील गॅस सोडला, तेव्हा तिचा नवरा चांगलाच खवळला आहे. पोटात बिघाड असेल तर पोट साफ करुन ये असे हा नवरा आपल्या बायकोला नंतर सांगताना दिसतोय. त्याबरोबरच हा माणूस महिलेवर चांगलाच भडकल्याचे दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान हा प्रकार प्रत्यक्षात घडला असावा असे व्हिडीओकडे पाहून वाटत नाहीये. व्हि़डीओतील पती-पत्नी अभिनय करत आहेत. हा अभिनय असला तरी व्हिडीओतील संकल्पना नेटकऱ्यांना आवडली आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. ‘official_niranjanm87’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वरील व्हिडीओला शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ

Video | घनदाट जंगलात लपून बसला, संधी मिळताच हरणावर झेप, पाहा वाघाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ

Video | पक्ष्यांच्या हल्ल्यामध्ये मांजर हतबल, शेवटी पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ

(while giving tea wife fart in front of husband video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें