Video | पक्ष्यांच्या हल्ल्यामध्ये मांजर हतबल, शेवटी पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राणी तसेच पक्षी असे दोघेही आहेत. दोन पक्ष्यांमुळे एका मांजरीची झालेली फजिती या व्हिडीओमध्ये कैद करण्यात आली आहे.

Video | पक्ष्यांच्या हल्ल्यामध्ये मांजर हतबल, शेवटी पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ
CAT AND BI

मुंबई : सोशल मीडियावर रोजच लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील बरेच व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. प्राण्यांची शिकार, पक्ष्यांच्या करामती या व्हिडीओंमध्ये असल्यामुळे लोक अशा प्रकारच्या व्हिडीओंना पसंद करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन पक्ष्यांमुळे एका मांजरीची झालेली फजिती कैद करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (bird fights with cat video went viral on social media)

सोशल मीडियावर प्राणी तसेच पक्ष्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मांजर आणि दोन पक्षी दिसत आहेत. या दोन्ही पक्ष्यांनी एकत्र येऊन मांजरीला जेरीस आणले आहे. पक्ष्याची हीच एकजूट नेटकऱ्यांना आवडली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन पक्षी आणि एक मांजर दिसत आहे. ही मांजर एका कंपाऊंडवर उभी आहे. मांजरीच्या भोवती दोन पक्षी आहेत. व्हिडीओतील मांजरीने पक्ष्यांच्या घऱट्यावर हल्ला केला असावा किंवा जीविताला धोका असावा म्हणून हे पक्षी मांजरीला त्रास देत आहेत. व्हिडीओमधील मांजर सुरुवातीला एका पक्ष्यावर हल्ला करत आहे. हल्ला होत असल्याचे समजताच तो पक्षी नंतर उडून दूर गेल्याचे दिसतेय. मात्र, पुढच्याच क्षणी दुसऱ्या एका पक्ष्याने मांजरीवर धाव घेतली आहे. नंतर हे दोन्ही पक्षी मांजरीवर योग्य संधी साधत हल्ला करत आहेत. आपल्या चोचीने हे पक्षी मांजरीचा चावा घेत आहेत. दोन्ही बाजूने सोबतच हल्ला होत असल्यामुळे नेमके काय करावे हे मांजरीला समजत नाहीये. शेवटी कंटाळून व्हिडीओतील मांजरीने या पक्ष्यांपासून पळ काढला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

एकूण 44 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दोन पक्ष्यांनी मांजरीला जेरीस आणल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत असून त्याला आपल्या अकाऊंटवर शेअर करत आहेत. मांजर आणि पक्ष्यांमधील हे युद्ध नेटकऱ्यांना चांगलंच भावलं आहे.

इतर बातम्या :

Video | वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी भडकली, रागात म्हणते ऑफिसमध्येच राहा, पाहा चिमुकलीचा मजेदार व्हिडीओ

Video | डोक्यावर भांडी, हातात प्लास्टिकची बकेट, सुपर वुमनची बाईक रायडिंग एकदा पाहाच

(bird fights with cat video went viral on social media)