Video | डोक्यावर भांडी, हातात प्लास्टिकची बकेट, सुपर वुमनची बाईक रायडिंग एकदा पाहाच

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा असाच काहीसा आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक महिला डोक्यावर भांड्याची टोपली घेऊन थेट पाण्यातून दुचाकी चालवत आहे.

Video | डोक्यावर भांडी, हातात प्लास्टिकची बकेट, सुपर वुमनची बाईक रायडिंग एकदा पाहाच
women viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 16, 2021 | 3:53 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात. तर काही व्हिडीओ व्हिडीओ आपल्या आश्चर्यात टाकतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा असाच काहीसा आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक महिला डोक्यावर भांड्याची टोपली घेऊन थेट पाण्यातून दुचाकी चालवत आहे. या महिलेचे कसब पाहण्यासारखे आहेत. (women riding bike with utensils video goes viral on social media)

डोक्यावर भांडे घेऊन महिला दुचाकी चालवत आहे

आपल्या देशात महिलांना दुय्यम लेखून त्यांना अनेक कामे करु दिली जात नाहीत. मात्र योग्य संधी दिली तर त्या संधीचे सोने करु शकतात. त्यांचे चातुर्य, काम करण्याची क्षमता अफाट असते. महिलांच्या या गुंणांची प्रचिती सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडओमधून पुन्हा समोर आली आहे. या व्हिडीओमधील महिला अतिशय धिरोदात्तपणे डोक्यावर भांडे घेऊन थेट पाण्यातून दुचाकी चालवत आहे. महिलेच्या याच धाडसाचे सोशल मीडियावर कौतूक केले जात आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला दिसत आहे. ती खुल्या मैदानात साचलेल्या पाण्यामध्ये भांडे धुत असल्याचे दिसतेय. भांडे स्वच्छ केल्यानंतर या महिलेने टोपलीत भांडे भरून ही टोपली डोक्यावर घेतली आहे. त्यानंतर या महिलेने एका हातात प्लास्टिकची बकेट तर दुसऱ्या हातामध्ये प्लास्टिकची पिशवी पकडली आहे. त्यानंतर ही महिला पायी निघून जाईल असे आपल्याला वाटते. मात्र, पायी न जाता ही महिला बाजूला उभ्या केलेल्या दुचाकीवर बसलेली आपल्याला दिसतेय. त्यानंतर महिलेने दुचाकी स्वत:हून सुरु केली आहे. विशेष म्हणजे डोक्यावर ठेवलेल्या भांड्यांना कोणताही सहारा नसताना ही महिला दुचाकीवर बसलेली आहे. डोक्यावर भांड्यांची टोपली एका हातामध्ये प्लास्टिकची बकेट तर दुसऱ्या हातमध्ये पिशवी असे सामान असताना ही महिला अतिशय आरामात दुचाकी चालवत आहे. महिलेचे धाडस नेटकऱ्यांना आवडले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला ‘@DoctorAjayita या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहताच नेटकरी अवाक् झाले आहेत. नेटकरी या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच हीच महिला नारी शक्तीचे द्योतक असल्याचेही नेटकरी म्हणत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

अरेच्चा! ही मांजर तर भविष्य सांगते, Euro 2020 सामन्यांबद्दल करतेय भविष्यवाणी, व्हिडीओ व्हायरल

Video | नवरीच्या नातेवाईकाने प्रेमाने गाल ओढले, नवरदेव खवळला, अन् सुरु झाली मारामारी, पाहा व्हिडीओ

(women riding bike with utensils video goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें