AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेच्चा! ही मांजर तर भविष्य सांगते, Euro 2020 सामन्यांबद्दल करतेय भविष्यवाणी, व्हिडीओ व्हायरल

काही वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वचषकात भविष्य सांगणारा पॉल बाबा अर्थात पॉल नावाचा ऑक्टोपस प्रसिद्ध झाला होता. आता रशियातील एक मांजरही युरो चषकातील सामन्यांच्या रिझल्टबाबत भविष्यवाणी करत आहे.

अरेच्चा! ही मांजर तर भविष्य सांगते, Euro 2020 सामन्यांबद्दल करतेय भविष्यवाणी, व्हिडीओ व्हायरल
भविष्यवाणी करणारी मांजर
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 3:38 PM
Share

सेंट पीटर्सबर्ग : जागतिक फुटबॉलमधील महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या युरो चषकाचे (Euro Cup 2020) सामने मोठ्या चुरशीत सुरु आहेत. पहिल्या दिवशीपासूनच उत्कंटावर्धक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. दरम्यान या चुरशीच्या सामन्यांत कोणता संघ विजयी होणार याचं भाकित करणारी एक मांजर रशियातून (Russia) समोर आली आहे. रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील हर्मिटेज मुझियममध्ये (Hermitage Museum) राहणाऱ्या या मांजरीचे नाव Achilles असं असून तिला ऐकू येत नाही. असे असतानाही तिचे सामन्यात विजयी कोणता संघ होणार याचे भाकित खरं ठरत असल्यानं सर्वच अचंबित झाले आहेत. (This Cat in St Petersburg Russia Predicts Who Will Win In EURO 2020 match)

ही मांजर मागील बऱ्याच वर्षांपासून फुटबॉलच्या सामन्यांबाबत भाकित करत आहे. 2017 सालच्या Confederations Cup मधील सामन्यांची भविष्यवाणी देखील या मांजरीने केली होती. त्यादरम्यानही तिचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता युरो चषकाच्या सामन्यादरम्यानचे तिचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 2018 मध्ये फिफा विश्वचषकातील सुरुवातीची मॅच रशिया जिंकेल अशी भविष्यवाणीही Achilles ने केली होती, जी खरी ठरली. त्यानंतर आता युरो चषकाच्या पहिल्या मॅचमध्येही इटलीने (Italy Beat Turky) टर्कीला पराभूत केलं. त्यानंतर बेल्जियमने रशियाला (Belgium beat Russia) धूळ चारली. या सामन्यांच भाकितही Achilles ने आधीच केलं होतं जे अगदी बरोबर ठरलं.

एक वाटी निवडून करते भविष्यवाणी

या मांजरीची भविष्यवाणी करण्याची पद्धत निराळीच आहे. तिच्यासमोर दोन वाट्यांमध्ये खाऊ ठेवला जातो. प्रत्येक वाटजवळ सामना असणाऱ्या संघाचा झेंडा लावला जातो. त्यानंतर ही मांजर कोणत्याही एका वाटीतील खाऊ आधी खाते आणि तोच संघ विजयी होतो.

हे ही वाचा :

Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

(This Cat in St Petersburg Russia Predicts Who Will Win In EURO 2020 match)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.