Video | नवरीच्या नातेवाईकाने प्रेमाने गाल ओढले, नवरदेव खवळला, अन् सुरु झाली मारामारी, पाहा व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असाच काहीसा असून त्याला पाहून तुम्हाला नक्कीच हसू फुटेल. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चांगलाच भडकल्याचे दिसतेय. तो समोरच्या व्यक्तीला थेट मारायला उठला आहे.

Video | नवरीच्या नातेवाईकाने प्रेमाने गाल ओढले, नवरदेव खवळला, अन् सुरु झाली मारामारी, पाहा व्हिडीओ
angry groom

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे लग्नसमारंभातील असतात. लग्न सोहळ्यातील बहुतांश व्हिडीओंमध्ये विनोद आणि धम्माल असल्यामुळे नेटकरी अशा व्हिडीओंना पसंद करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असाच काहीसा असून त्याला पाहून तुम्हाला नक्कीच हसू फुटेल. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चांगलाच भडकल्याचे दिसतेय. तो समोरच्या व्यक्तीला थेट मारायला उठला आहे. (Groom got angry on relatives of Bride video went viral on social media)

नवरा मुलगा भडकला

लग्नाचा क्षण हा खास असावा असे प्रत्येकालाच वाटते. याच कारणामुळे अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करतात. त्यांच्या याच कल्पनाशक्तीमुळे ते कधीकधी सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर दुसरीकडे काही व्हिडीओमध्ये आपण नवऱ्या मुलाची तर काही व्हिडीओंमध्ये नवरीची झालेली फजिती पाहतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवऱ्या मुलाची फजिती झाली आहे. या व्हिडीओमध्ये नवरीच्या नातेवाईकांनी गंमत केल्यामुळे नवरा मुलगा चांगलाच भडकला आहे. नवरा मुलगा एवढा भडकला आहे की तो बाजूला बसलेल्या नवरीलासुद्धा ऐकत नाहीये.

गाल ओढल्यामुळे नवरदेवाला  राग अनावर

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे नवरदेव गळ्यात वरमाला टाकून एका खुर्चीवर बसला आहे. त्याच्याच बाजूला सुंदर अशी नवरी बसली आहे. यावेळी नवऱ्या मुलाच्या मागे एक माणूस उभा असल्याचे आपल्याला दिसते. उभ्या असलेल्या माणसाच्या मागे आणखी एक महिला उभी आहे. यावेळी व्हिडीओमध्ये नवऱ्या मुलाच्या मागे उभा असलेला माणूस सुरुवातीला आपल्याला शांत दिसतो आहे. मात्र, काही सेकंदांनतर तो नवऱ्या मुलाचे गाल धरून ओढतो आहे. त्यानंतर उभा असलेला माणूस पुन्हा-पुन्हा गाल ओढत असल्यामुळे नवरा मुलगा त्याला विरोध करतो आहे. नवरदेव विरोध करत असला तरी हा माणूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. तो जोरजोरात नवरदेवाचे गाल ओढतोय. परिणामी नवरा मुलगा शेवटी चांगलाच भडकला आहे. राग अनावर झाल्यामुळे नवरदेवाने गाल ओढणाऱ्या माणसाला थेट मारणे सुरु केले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, नवऱ्या मुलाला राग एवढा अनावर झाला आहे की, तो आपल्या नव्या नवरीचेसुद्धा ऐकत नाहीये. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी खदखदून हसत आहेत. तसेच मजेदार प्रतिक्रियासुद्धा देत आहेत.

इतर बातम्या :

Video | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम

Video | जिम सुरु झाल्याचा अत्यानंद, महिलेने साडी नेसून ‘झिंगाट’च्या तालावर केले वर्कआऊट! पाहा व्हिडीओ

(Groom got angry on relatives of Bride video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI