Video | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम

या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क शाहरुख खानसारखाच दिसत असून तो शाहरुखची हुबेहुब नक्कल करतोय. त्याने केलेला अभिनय लोकांना चांगलाच आवडला आहे. कदाचित याच कारणामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Video | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम
SHAHRUKH KHAN

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. एकदा व्हिडीओ व्हायरल झाला की लोकांमध्ये मोठी चर्चा होते. याच एका कारणामुळे चर्चेत येण्यासाठी अनेकजण प्रचंड मेहनत घेतात. मिमिक्री, अभिनय तसेच इतर अनेक मार्गांनी लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा अशाच एका अभिनयाचा आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क शाहरुख खानसारखाच दिसत असून तो शाहरुखची हुबेहुब नक्कल करतोय. त्याने केलेला अभिनय लोकांना चांगलाच आवडला आहे. कदाचित याच कारणामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (man looking like Shahrukh Khan acting in Dilwale film song video went viral on social media)

व्हिडीओतील तरुण दुसरा शाहरुख खान

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हुबेहुबपणे शाहरुख खानसारखा दिसत आहे. तो दिलवाले या चित्रपटातील गीतावर अभिनय करतो आहे. यावेळी त्याने अगदी शाहरुख सारखेच कपडे परिधान केले आहेत. तसेच डोळ्यावर चस्मासुद्धा शाहरुख सारखाच लावला आहे. विशेष म्हणजे त्याचे केसही अगदी शाहरुख खानसारखेच आहेत. तरुणाच्या या बाह्यावतारामुळे लोक खरा शाहरुख खान तसेच व्हिडीओतील तरुण यांच्यात फरक करु शकत नाहीयेत.

दुनिया भुलाके तुमसे मिला हूँ या गीतावर अभिनय

या व्हिडीओमध्ये तो ‘दुनिया भुलाके तुमसे मिला हूँ’ या गीतावर शाहरुख सारखा अभिनय करतो आहे. तसेच तो अधूनमधून शाहरुख सारखाच डान्सही करतोय. या छोट्याशा व्हिडीओमुळे नेटकरी या तरुणावर प्रभावित झाले आहेत. तरुणाच्या या अभिनयाला नेटकऱ्यांनी चांगलीच दाद दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Ibrahim qadri (@ibrahim__qadri)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, तरुणाने ‘ibrahim__qadri’ या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच उत्स्फूर्तपणे प्रतिक्रियासुद्धा देत आहेत.

इतर बातम्या :

Video | जिम सुरु झाल्याचा अत्यानंद, महिलेने साडी नेसून ‘झिंगाट’च्या तालावर केले वर्कआऊट! पाहा व्हिडीओ

‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस!

Baba Ka Dhaba | पुन्हा रस्त्यावर आलेल्या कांता प्रसादना फूड ब्लॉगर गौरवने केले माफ! फोटो शेअर करत म्हणाला…

(man looking like Shahrukh Khan acting in Dilwale film song video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI