Video | वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी भडकली, रागात म्हणते ऑफिसमध्येच राहा, पाहा चिमुकलीचा मजेदार व्हिडीओ

सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय़ ठरत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आपल्या वडिलांवर रागवत आहे.

Video | वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी भडकली, रागात म्हणते ऑफिसमध्येच राहा, पाहा चिमुकलीचा मजेदार व्हिडीओ
little child viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 16, 2021 | 4:36 PM

मुंबई : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्डिडीओ नेहमीच चर्चेचा विषय़ असतात. मुलांचा खट्याळपणा, त्यांचे लडिवाळपणे बोलणे सर्वांनाच आवडते. कदाचित याच कारणामुळे लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय़ ठरत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आपल्या वडिलांवर रागवत आहे. (little girl upset with father office work routine video goes viral on social media)

मुलीचा वडिलांवर राग

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगी आपल्या वडिलांच्या कामावर दु:खी आहे. तिचे वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी आपल्या वडिलांवर रागवत आहे. ती आपल्या वडिलांना तुम्ही ऑफिसमध्येच राहा. तेच तुमचे घर आहे, असे लाडिवाळपणे म्हणत आहे. तसेच ऑफिसमध्ये राहिल्यानंतर जेव्हा जेवण मिळणार नाही, तेव्हा तुम्हाला आमची आठवण येईल. जेवण न मिळाल्यामुळे मुलगी बरोबर बोलत होती, हेही तुम्हाला समजेल, असे व्हिडीओतील मुलगी आपल्या वडिलांना उद्देशून म्हणत आहे.

तुम्ही न आल्यामुळे मम्मी तसेच माझी तब्येत खराब होईल

तसेच या व्हिडीओत मुलगी आपल्या वडिलांना रागावत असताना तुम्ही वेळेवर घरी येत नाही, असे म्हणतेय. तुम्ही घरी आले नाही तर मम्मी जेवण करणार नाही. मग मम्मीची तब्येत खराब होईल. त्यानंतर माझीही तब्येत खराब होईल. आम्ही दोघीही बेशुद्ध होऊन पडू. आम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही, असे ही मुलगी खट्याळपणे म्हणत आहे.

समजलं असेल तर व्हिडीओ कॉल करा

ही मुलगी अतिशय रागात आपल्या वडिलांना बोलत आहे. मात्र, तिचा हा राग नेटकऱ्यांना हवाहवासा वाटतोय. पुढे रागामध्येच ही मुलगी आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल किंवा मेसेज करायला सांगते आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, मुलीच्या रागवण्याचा अंदाज सर्वांनाच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भारावले असून मुलीच्या लडिवाळपणाचे ते चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओला पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | डोक्यावर भांडी, हातात प्लास्टिकची बकेट, सुपर वुमनची बाईक रायडिंग एकदा पाहाच

Janvhi Kapoor | श्रीदेवीची लेक पुन्हा एकदा दिसली ‘मिस्ट्री बॉय’सोबत, जान्हवीच्या बिकिनी फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Video | नवरीच्या नातेवाईकाने प्रेमाने गाल ओढले, नवरदेव खवळला, अन् सुरु झाली मारामारी, पाहा व्हिडीओ

(little girl upset with father office work routine video goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें