Janvhi Kapoor | श्रीदेवीची लेक पुन्हा एकदा दिसली ‘मिस्ट्री बॉय’सोबत, जान्हवीच्या बिकिनी फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष!

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह दिसत आहे. ही अभिनेत्री दररोज आपल्या फोटोंद्वारे आणि व्हिडीओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकतेच अभिनेत्रीने आपले बिकीनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, हे पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

Janvhi Kapoor | श्रीदेवीची लेक पुन्हा एकदा दिसली ‘मिस्ट्री बॉय’सोबत, जान्हवीच्या बिकिनी फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष!
जान्हवी कपूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) हिने आपल्या करिअरची सुरूवात ‘धडक’ या चित्रपटाने केली होती. या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टर अभिनेत्रीसोबत दिसला होता. ‘धड़क’ हा ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. चाहत्यांना देखील हा चित्रपट खूप आवडला आणि जान्हवीचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर जान्हवीच्या वाट्याला बरेच चित्रपट आले. दरम्यान, चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीने एका मिस्ट्री बॉयसह एक फोटो शेअर केला आहे (Janvhi Kapoor share photo with Mystery boy Orhan Awatramani).

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह दिसत आहे. ही अभिनेत्री दररोज आपल्या फोटोंद्वारे आणि व्हिडीओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकतेच अभिनेत्रीने आपले बिकीनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, हे पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

जान्हवीसह ‘तो’ मुलगा कोण?

अलीकडेच अभिनेत्रीने आपले बिकिनी फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती ओले केसांना सावरताना दिसत आहे. तर, दुसरा फोटो ज्यावर प्रत्येकाचे डोळे स्थिरावले आहेत. या फोटोमध्ये ती एका मिस्ट्री बॉयसह दिसली आहे.

या फोटोमध्ये जान्हवी एका मिस्ट्री बॉयचा हात पकडून पळताना दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे हा फोटो त्यांच्या पाठमोरा घेतलेला आहे. फोटोमध्ये मिस्ट्री बॉयही शर्टलेस दिसत आहे. याशिवाय जान्हवी एका फोटोमध्ये बसलेली दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्री जान्हवीचा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, अभिनेत्रीसोबत तो मुलगा नक्की कोण आहे? या फोटोत जान्हवीसोबत दिसणाऱ्या मुलाचे नाव ओरहान अवात्रामणि (Orhan Awatramani ) असे आहे. या आधीही जान्हवीचे आणि ओरहान अवात्रामणि एकत्र फोटो व्हायरल झाले आहेत. दोघेही बेस्ट फ्रेंड असल्याचे सांगितले जाते.

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच ‘रुही’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव झळकला होता. या चित्रपटात ती एका नवीन अवतारात दिसली. याखेरीज अभिनेत्रीचा ‘दोस्ताना 2’ हा चित्रपट कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने चर्चेत आला आहे. याआधी जान्हवीचे नाव ईशान खट्टर सोबतही जोडले गेले होते. मात्र, दोघांनीही आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे म्हणत हे वृत्त फेटाळून लावले आहे.

(Janvhi Kapoor share photo with Mystery boy Orhan Awatramani)

हेही वाचा :

Chandrashekhar Vaidya | रामायणातील ‘आर्य सुमंतां’ना देवाज्ञा, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lookalike: हुबेहूब दीपिका पादुकोणसारखी दिसते, ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीचे फोटो पाहिलेत का?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI