Chandrashekhar Vaidya | रामायणातील ‘आर्य सुमंतां’ना देवाज्ञा, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूड अभिनेता चंद्रशेखर वैद्य (Chandrashekhar Vaidya) यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले आहे. ‘रामायण’ (Ramayana) या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत ‘आर्य सुमंत’ची भूमिका करून ते खूप चर्चेत आले होते. चंद्रशेखर यांचे आज (16 जून) सकाळी 7 वाजता निधन झाले.

Chandrashekhar Vaidya | रामायणातील ‘आर्य सुमंतां’ना देवाज्ञा, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चंद्रशेखर वैद्य
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 16, 2021 | 2:26 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता चंद्रशेखर वैद्य (Chandrashekhar Vaidya) यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले आहे. ‘रामायण’ (Ramayana) या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत ‘आर्य सुमंत’ची भूमिका करून ते खूप चर्चेत आले होते. चंद्रशेखर यांचे आज (16 जून) सकाळी 7 वाजता निधन झाले. त्यांच्यावर आजच अंत्य संस्कार केले जाणार आहेत. चंद्रशेखर यांचा मुलगा अशोक यांनी ई-टाइम्सशी बोलताना म्हणाले की, वडील चंद्रशेखर यांचे झोपेतच निधन झाले आहे. त्यांना कोणतीही आरोग्य विषयक समस्या नव्हती (Ramayana Aary Sumant Fame Actor Chandrashekhar Vaidya passed away).

गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने एका दिवसासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दवाखान्यातून घरी आणले होते आणि घरातच त्यांच्यासाठी ऑक्सिजनसारख्या सर्व सुविधा तयार करण्यात आल्या होत्या आणि इतर जे काही त्यांना आवश्यक होते, त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

एबीपी न्यूजशी बोलताना चंद्रशेखर यांचे नातू विशाल म्हणाले की, त्यांना आपले शेवटचे दिवस आपल्या कुटुंबासमवेत घालवायचे होते. या कारणास्तव, त्याने त्यांना रूग्णालयातून आपल्या घरी आणले, जेणेकरून ते कुटुंबातील सर्वांबरोबर अधिकाधिक वेळ घालतील.

अशोक पुढे म्हणाले की, ते काल रात्री ठीक होते. शेवटी त्यांना थोडा त्रास झाला होता. त्यांचे निधन होणे आमच्यासाठी सर्वात मोठी दुःखद घटना आहे. सायंकाळी चार वाजता विलेपार्ले येथे त्यांचे अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.

कारकीर्द

अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांनी त्यांच्या कारकिर्दीत 250 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1953 मध्ये रिलीज झालेला ‘सुरंग’ हा मुख्य नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. याशिवाय ते ‘गेट वे ऑफ इंडिया’, ‘फॅशन’ (1957), ‘बरसात की रात’ (1960) अशा बर्‍याच चित्रपटांत दिसले होते.

अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले आहे. त्यांचा सुपरहिट म्युझिकल चित्रपट ‘चा चा चा’ (1964) चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून हेलन प्रथमच मुख्य अभिनेत्री म्हणून झळकल्या होत्या.

या अभिनेत्याचे आजोबा!

त्याशिवाय चंद्रशेखर यांनी 1985 ते 1996 या काळात CINTAA (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. चंद्रशेखर हे टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा यांचे आजोबा देखील आहेत. शक्ती आजोबांसोबत बर्‍याचदा फोटो शेअर करत असे.

(Ramayana Aary Sumant Fame Actor Chandrashekhar Vaidya passed away)

हेही वाचा :

Photo : नऊवारी साडी आणि मराठी बाणा, रुपाली भोसलेचं सुंदर फोटोशूट

विवेक मेहराच्या आधीही एका व्यक्तीशी लग्न, केवळ वर्षभर टिकला संसार, नीना गुप्तांचा मोठा खुलासा!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें