Happy Birthday Mithun Chakraborty | अभिनेता म्हणून पहिल्याच चित्रपटातून मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्तीबद्दल…

'डिस्को डान्सर' बनून नवा ट्रेंड सेट करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आज (16 जून) आपला 71वा वाढदिवस साजरा करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी बांगलादेशात झाला होता. मिथुन चक्रवर्ती बहु-प्रतिभावान असून नृत्य, अभिनय, निर्माता याच्यासह ते एक उत्तम लेखकही आहेत.

Happy Birthday Mithun Chakraborty | अभिनेता म्हणून पहिल्याच चित्रपटातून मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्तीबद्दल...
मिथुन चक्रवर्ती
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 16, 2021 | 11:28 AM

मुंबई : ‘डिस्को डान्सर’ बनून नवा ट्रेंड सेट करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आज (16 जून) आपला 71वा वाढदिवस साजरा करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी बांगलादेशात झाला होता. मिथुन चक्रवर्ती बहु-प्रतिभावान असून नृत्य, अभिनय, निर्माता याच्यासह ते एक उत्तम लेखकही आहेत. मिथुनदादांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. त्याचा अभिनय इतका दमदार आहे की, त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते (Happy Birthday Mithun Chakraborty know about actors career journey).

कोलकात्यात राहणारे मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेता होण्यासाठी प्रथम अभिनय शिकण्याचे ठरवले. कोलकाता सोडल्यानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. जिथून त्यांनी अभिनय शिकून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

‘दो अंजाने’मध्ये मिळाली भूमिका

अभिनताचे शिक्षण घेतल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांचा संघर्ष सुरू झाला. ते प्रथम बॉलिवूड अभिनेत्री हेलनचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. मिथुन चक्रवर्ती यांना हेलनबरोबर काम केल्याचा खूप फायदा झाला. हेलनबरोबर काम करत असताना त्यांना अमिताभ बच्चन यांच्या ‘दो अंजाने’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तथापि, ते केवळ काही मिनिटांसाठीच चित्रपटात दिसले होते.

‘मृगया’साठी राष्ट्रीय पुरस्कार

मिथुन चक्रवर्ती यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट ‘मृगया’ होता. मृणाल सेन यांच्या ‘मृगया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मृगया’च्या कथेबद्दल बोलायचे तर, या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांनी एका अशा मुलाची भूमिका साकारली होती जो आपल्या पत्नीवरील लैंगिक अत्याचाराविरूद्ध आवाज उठवतो. या चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीचा काळ दर्शवला गेला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही. परंतु, उत्कृष्ट अभिनयाबद्दल मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या चित्रपटानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे बर्‍याच दिवसांपर्यंत काम नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर त्यांनी ‘अग्निपथ’, ‘वारदात’, ‘साहस’,  ‘वाँटेड जल्लाद’, ‘प्यारी बेहना’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देऊन चाहत्यांच्या मनात आपले हक्काचे स्थान तयार केले.

350 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केले काम

मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात त्यांनी हिंदी, बंगाली, पंजाबी, भोजपुरी यासह अनेक भाषांमध्ये काम केले आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारासह फिल्मफेअर पुरस्कारही पटकावला आहे.

मिथुन चक्रवर्ती अजूनही चित्रपटात काम करत आहे. नुकताच त्याने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

(Happy Birthday Mithun Chakraborty know about actors career journey)

हेही वाचा :

विवेक मेहराच्या आधीही एका व्यक्तीशी लग्न, केवळ वर्षभर टिकला संसार, नीना गुप्तांचा मोठा खुलासा!

Photo : पेंटिंगमध्ये पोज देत श्रुती हसनचं नवं फोटोशूट, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें