नातवंडे पाहण्याची आईला हौस, लेस्बियन मुलीला दिले थेट शुक्राणूंचे इंजेक्शन

नातवंडे पाहण्याच्या इच्छेपोटी एका महिलेने आपल्याच लेस्बियन मुलीला शुक्राणूंचे इंजेक्शन टोचले आहे. या महिलेने मुलीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे शुक्राणू सोडल्याचे खुद्द त्या मुलीनेच सांगितले आहे.

नातवंडे पाहण्याची आईला हौस, लेस्बियन मुलीला दिले थेट शुक्राणूंचे इंजेक्शन
सांकेतिक फोटो

ब्रिटन : लेकरांची हौस सगळ्यांनाच असते. मुल जन्मल्यानंतर पती-पत्नी तसेच कुटुंबीयांना होणारा आनंदही वेगळाच असतो. मात्र, लेकराच्या वेडापाई काही लोक अतिशय विचित्र काम करततात. त्यांच्या याच करामतीमुळे नंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नातवंडे पाहण्याच्या इच्छेपोटी एका महिलेने आपल्याच लेस्बियन मुलीला शुक्राणूंचे इंजेक्शन टोचले आहे. या महिलेने मुलीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे शुक्राणू सोडल्याचे खुद्द त्या मुलीनेच सांगितले आहे. (mother injected sperm injection to his daughter for grandchild)

नेमका प्रकार काय आहे ?

सध्या चर्चेत आलेला हा प्रकार ब्रिटनमधील असून एसमदर्ड या रियालिटी शोमध्ये या मुलीने हा प्रकार सांगितला आहे. हा रियालिटी शो यापूर्वी अनेकवेळा वादामध्ये सापडलेला आहे. ज्या आई आणि मुलीमध्ये अतिशय घनिष्ठ संबंध आहेत; अशा आई-मुलीच्या जोड्या या रियालिटी शोमध्ये दाखवल्या जातात. याच रियालिटी शोमध्ये सामील झालेल्या लॉरेनने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला.

आईला नातवंडांसोबत खेळण्याची इच्छा

लॉरेन एक लेस्बियन असून तिच्या आईने नेमके काय केले याबाद्दल सांगितले आहे. “मला माझ्या आईमुळे विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे. माझ्या आईला नातवंडं पाहण्याची खूप इच्छा आहे. मात्र मी मुलांना जन्म देण्यास उत्सुक नसल्याचे समजल्यानंतर माझ्या आईने मला शुक्राणूंचे इंजेक्शन दिलं. माझ्या आईला माझ्या मुलांसोबत खेळण्याची खूप इच्छा आहे, कदाचित याच कारणामुळे तिने असं केलं असावं” असे लॉरेनने एसमदर्ड या रियालिटी शोमध्ये सांगितले आहे.

मला वाटतं मी दोन महिलांसोबत लग्न केलं आहे

लॉरेन एक लेस्बियन आहे. ती ज्या मुलीसोबत रिलेशनशिमध्ये आहे, त्या मुलीने लॉरेनच्या आईबद्दल मत प्रदर्शित केलं आहे. “लॉरेन आणि तिच्या आईमधील जवळीक पाहून कधीकधी दोन महिलांसोबत लग्न केल्यासारखं मला वाटतं. मी लॉरेन आणि तिच्या आईसोबत लग्न गेल्याचं मला वाटतं,” अशी लॉरेनच्या पार्टनरने प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, लॉरेनला शुक्राणूंचे इंजेक्शन दिल्याची तिच्या पार्टनरला कल्पना नाही. मात्र, नातवाच्या वेडापाई आपल्या लेस्बियन मुलीला थेट शुक्राणूंचे इंजेक्शन दिल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | लग्न उरकून थेट पाणीपुरीच्या ठेल्यावर, नव्या जोडीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | ना लोकांची भीती, ना नवरीची चिंता, भर मंडपात तंबाखू खाणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

Video | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

(mother injected sperm injection to his daughter for grandchild)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI